सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
वाशिवली येथील कै.निर्मंला दामोदर बडेकर यांचे हृदयविकाराने निधन झाल्याने बडेकर कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे.त्यांच्या मृत्यूची वा-यासारखी पसरताच आसपासच्या परिसरातील नागरिकांची त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी जमली होती.त्यांच्यावर वाशिवली स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै.निर्मंला बडेकर यांचे उत्तरकार्यं शुक्रवार दि.25 फेब्रुवारी रोजी राहत्या घरी होणार असून यावेळी सकाळी 10 ते 11 हभप हरिश्चंद्र महाराज जाधव यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.कै.निर्मला यांचा सरळ साधा स्वभाव सर्वांना हवाहवासा वाटायचा. त्यांचा अचानक मृत्यू झाल्याने परीसरात शोक व्यक्त केला जात आहे.त्यांच्या पश्च्यात पती,दिर,जावा,सुना,मुले, नातवंडे,पातवंडे असा मोठा परिवार आहे.








Be First to Comment