शिवसेना तालुका संघटक बी एन डाकी यांना बंधू शोक
सिटी बेल • उरण • सुनिल ठाकूर •
नुकताच खोपटे येथील अष्टपैलू व्यक्तिमत्व तालुका संघटक तथा उपाध्यक्ष अवजड वाहतूक सेना रायगड श्री बी एन डाकी यांचे बंधू संजय नारायण डाकी यांचे नुकताच वयाच्या 47 व्या वर्षी आकस्मिक दु:खद निधन झाले.
संजय डाकी हे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय खोपटे चेरमन, खोपटे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष, खोपटे प्रादेशिक पाणी कमिटी सभापती, विघ्नहर्ता वाहतूक टेम्पो संघटना चेअरमन, खोपटा स्पोर्ट्स अध्यक्ष, नाट्य वेद, आणि पराग नाट्य मंडळाच्या माध्यमातून स्थानिक तसेच महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत भूमिका सादर केल्या. सामाजिक व राजकीय प्रवासात पदरला झिज घेऊन लोक कार्य केले, काँटिनेंटल कंपनी मध्ये अनेक गरीब गरजूंना नोकरीत लावून रोजगार मिळवून दिला.
कै, संजय डाकी एक उत्कृष्ट वक्ता, कार्यकर्ता, समालोचक, गोरगरीबांना अडल्या प्रसंगी मदत करणारा, समाजात राजकारणात तसेच अनेक संस्था मध्ये पारदर्शक आणि निस्वार्थकाम करताना वेळ प्रसंगी पदरमोड करुन जनतेची कामे केली. अनेकांना लग्न कार्य संसारात मदत करून हातभार लावला. खोपटे भाग शाळा, आणि खोपटे स्पोर्ट्स च्या माध्यमातून खोखो संघास तालुका, जिल्हा, व राज्य पातळीवर पारितोषिके मिळवली.
असा हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपल्या मुले खोपटे गाव शिवसेना शाखा खोपटे तसेच बी एन डाकी परिवार व आप्तेष्ट मित्र परिवार यांची भरुन न येणारी हानी झाली आहे.
त्यांच्या पश्चात त्यांना आई ,पत्नी ,दोन मुले ,तीन बहिणी ,पाच भावांची मुले ,भाचे भाची भाऊ बी एन डाकी असा मोठा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक 25/2/2022 रोजी नाना नानी पार्क अस्थी विसर्जन घाट खोपटे येथे होणार असून बारावा दिनांक 27/2/2022 रोजी खोपटे येथील राहत्या घरी होणार आहे.
Be First to Comment