बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या पार्वती म्हस्के यांनी ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिटी बेल • खांब-रोहे • नंदकुमार मरवडे •
रोहे तालुक्यातील मुठवली बु.येथील रहिवासी तथा बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या वारकरी संप्रदायाच्या निस्सीम भक्त ह.भ.प.पार्वती गंगाराम म्हस्के यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी राहत्या घरी व्रुद्धपकालाने दु:खद निधन झाले.
भारतीय स्वात़ंत्र्यपूर्व काल प्रत्यक्ष अनुभवलेल्या व त्या वेळच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील आठवणी सांगणा-या तसेच पंतप्रधान इंदिरा गांधी समवेत एका कार्यक्रमात प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी वार्तालाप करून एक आठवण म्हणून आपला फोटो काढणा-या पार्वती म्हस्के या मुंबईत गोदीमध्ये सुपरवायझर या पदावर कार्यरत होत्या. स्वतः चांगल्या शिकल्या असल्याने त्यांनी आपल्या मुलांबाळांवर देखील चांगले सुसंस्कार केले.त्यांच्या दु:खद निधनाचे वृत्त समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यासह त्यांचे आप्तस्वकीय, मित्र परिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.
त्यांच्या पश्चात संतोष, संदीप ही दोन मुले व मुलगी दर्शना,सुना,जावई,नातवंडे,पतवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी शुक्र. दि.२५ रोजी तर अंतिम धार्मिकविधी सोम. दि.२८ रोजी मुठवली बु.येथील राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.








Be First to Comment