सामाजिक कार्यकर्ते,प्रगतशील शेतकरी, पहूर ग्रामपंचायत माजी सरपंच मारुती वाळंज यांचे दुःखद निधन
सिटी बेल • गोवे-कोलाड • विश्वास निकम •
रोहा तालुक्यातील वाळंजवाडी येथील ज्येष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते,प्रगतशील शेतकरी तसेंचव पहुर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, मारुती वेटू वाळंज यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी आकस्मित निधन झाले.ते बळीराजा शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष, कुणबी समाजाचे पदाधिकारी, तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी होते.
मारुती वाळंज हे समाजाचा न्याय निवडा करणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडने तर शेतकरी वर्गाला व त्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे या करिता अनेकदा निस्वार्थी पणे काम केले आहे. त्यामुळे ते वाळंजवाडी पंचक्रोशी सह बकोलाड विभागात सर्वांनी सुपरिचित होते.
त्याच्या अंत्यविधीसाठी असंख्य जनसमुदाय उपस्थित होता. त्यांचा पुढील दशक्रिया विधी दि. २६ फेब्रुवारी रोजी पहुर येथे तर उत्तर कार्य दि.२८ फेब्रुवारी२०२२ रोजी त्यांच्या राहत्या घरी वाळंजवाडी येथे होणार आहे.अत्यंत मनमिळाऊ स्वभाव, सामाजिक कार्याची आवड असलेल्या, मारुती वाळंज यांच्या आकस्मिक निधनाने वाळंज परिवार तसेच मित्र परिवारा मध्ये दुखः व्यक्त केले जात आहे.








Be First to Comment