शेकाप व सामाजिक कार्यकर्ते सुनिल पाटील यांचे दुखःद निधन
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
शेतकरी कामगार पक्षाचे तिस-या पिढीचा लाल बावटा खांद्यावर घेऊन सामाजिक कार्य करणारे सुनिल एकनाथ पाटील यांचे वयाच्या 53 व्या वर्षी अल्प आजाराने दुखःद निधन झाले आहे.
वडिल एकनाथ पाटील यांच्या कडून राजकीय वारसा घेत घेत सुनिल पाटील हे 1997 साली शेतकरी कामगार पक्षा कडून वशेणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले . तर 2007 साली त्यांची पत्नी योजना सुनिल पाटील ह्या ग्रामपंचायत सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या.

राजकारणा सोबत सामाजिक कार्यात सुनिल पाटील यांचा हातभार होता. माघी गणेश मित्रमंडळ वशेणी आणि राधाकृष्ण मंदिर जिर्णोद्धार कमिटीत ते सक्रिय सदस्य होते. तर आवरे पंचायत गणातून त्यांनी काही काळ विभागीय चिटणीस म्हणून पदभार सांभाळला होता. त्यांची दशक्रिया विधी कार्य दि.20 /2/22 रोजी वशेणी बहिरीदेवस्थान येथे होणार आहे.








Be First to Comment