Press "Enter" to skip to content

पुजा मोहन यांची धडक कारवाई

बनावट कंपनीकडून शिपिंग क्षेत्रात नोकरीचे आमिष देऊन तरुणाची फसवणूक

सिटी बेल | बेलापूर |

शिपिंग क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून अनेक सिफेरर्स तरूणांची आर्थिक फसवणूक केली जाते. अनेक एजेंट आणि बनावट कंपन्या हे तात्पुरत्या भाडे तत्वावर कार्यालय चालू करतात. सोशल मीडियावर जाहिरातीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीचे आमिष देतात आणि आर्थिक फसवणूक करतात. तसेच त्यांचे सी. डी. सी आणि पासपोर्टसुद्धा ठेवून घेतात. त्यामुळे तरुणांना इतरत्र नोकरी शोधता येत नाही.

शिपिंग क्षेत्रात नोकरीच्या नावाखाली पैसे उकळण्याचे अनेक गैरप्रकार सुरू आहेत. असाच प्रकार नवीमुंबई मधील बेलापूर सी बी डी मध्ये घडला आहे. भावेश पटेल वय वर्ष 26 ह्या तरुणाची फसवूक झाल्याचे उघडकीस आले आहे. ह्या तरुणाने शिपिंग AB Rank ह्या पदाच्या कामासाठी त्याचा पासपोर्ट आणि सी डी सी सहा महिन्यापूर्वी अविसा मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. ह्या बनावट कंपनीचा मालक गुलशन कुमार ह्याला दिले होते.

गुलशन कुमारने त्या तरुणाला 4 दिवसात नोकरीला लावतो असे आमिष देऊन त्याची फसवणूक करत होता. तसेच त्याच्याकडे 1 लाख 80 हजार रुपयांची मागणी करत होता पण भावेशला यात काहीतरी गौडबंगाल आहे हे लक्षात आले आणि त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्याचा पासपोर्ट आणि सी डी सी परत द्यावी अशी मागणी केली. परुंतु गुलशन कुमार त्याला सतत टाळाटाळ करत होता. आज देतो उद्या देतो असे करून भावेश पटेल ची फसवणूक करत होता.

अखेरीस कंटाळून भावेश ने नवीन पनवेल मधील महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष पुजा मोहन यांच्याकडे आपली कैफियत मांडली. क्षणाचाही विलंब न करता पुजा मोहन यांनी सी बी डी पोलीस स्टेशन गाठले आणि रीतसर ह्या बनावट कपंनीच्या मालकावर गुन्हा नोंद केला. पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले परंतु कारवाई होत नसल्याचे लक्षात येताच नवीन पनवेल महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष पुजा मोहन यांनी बेलापूर येथील रहेजा अर्केड मधील अविसा मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. ह्या बनावट कार्यालयाला धडक दिली.

त्याठिकाणी मालक गुलशन कुमार ह्याला सदर बाबीबद्दल विचारले असता तो पुन्हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. भावेश पटेल चा पासपोर्ट आणि सी डी सी देण्यास टाळाटाळ करू लागला. हुज्जत घालू लागला. याच वेळी पूजा मोहन यांनी आपला दणका दाखवताच त्याच्या जवळच असलेल्या ड्रावर मधून भावेश पटेल चा पासपोर्ट आणि सी डी सी दिले. गुलशन कुमार च्या कार्यालयात तो चालवत असलेल्या कपंनी चे अधिकृत सर्टिफिकेट किंवा कागदपत्रे न्हवती म्हणजे हे बनावट कंपनी वाले कशी तरुणांची फसवणूक आणि पिळवणूक करते हे पाहावयास मिळाले. तरुणांना नोकरीचे आमिष देऊन पैसे उकळण्याचा धंदा सुरु आहे याला आळा घालणे फार गरजेचे आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.