सिटी बेल | पेण | वार्ताहर |
केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली असणा-या मुंबई मध्य रेल्वेच्या परेल येथे टेक्निशियन या पदावर काम करणारे पेण तालुक्यातील अंतोरे गावचे रहिवासी व राष्ट्रीय जलतरणपटू म्हणून नाव मिळविले चिंतामण कमल पाटील यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.निधना समयी ते ६० वर्षोचे होते त्यांना पत्नी, दोन मुले, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांचा दहावा नाशिक येथे तर बारावा १० फेब्रुवारी २०२२ रोजी अंतोरे येथे होणार आहे.
चिंतामण पाटील यांना लहानपणापासूनच पोहण्याची हौस असल्याने त्यांनी रायगड जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांना जलतरणाचे धडे दिले त्या दरम्यान धरमतर ते मुंबई गेटवे असा अनेकदा जलतरण प्रवास त्यांनी घडविला या स्पोर्ट्स मुळे त्यांची मुंबई रेल्वे मध्ये भरती झाली मात्र ३६ वर्षोनंतर ते रेल्वेमधून निवृत्त झाले
स्वभावाने अतिशय मनमिळावू व प्रत्येकाला आदराने,आपुलकीने आवाज देणारे होते यांच्या निधनाची बातमी मिळताच अनेकांनी त्यांच्या अंत्ययात्रेला हजेरी लावली त्यांचा अंत्यसंस्कार अंतोरे येथील स्मशानभूमीत करण्यात आला.








Be First to Comment