सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रोटरी ऑफ क्लब पाताळगंगाचे अध्यक्ष गणेश काळे यांच्या मातोश्री शकुंतला काळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . मृत्यू समयी त्या ७६ वर्षांच्या होत्या .
एच.ओ. सी . प्रायमरी स्कूल येथे प्रदिर्घ काळ सेवेत असलेल्या श्रीमती शकुंतला दामोदर काळे या कष्टाळू व मनमिळाऊ स्वभावामुळे सर्व परीसरात परिचीत होत्या . समाजसेवेत त्यांचा सतत खारीचा वाटा असायचा . ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सकपाळ यांच्या संस्थेशी त्यांची जवळीक होती . त्यांच्या पश्चात दोन मुले , सुना , एक मूलगी , जावई सहा नातवंडे असा परिवार आहे .
मूलगा रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा अध्यक्ष गणेश काळे , इस्रो कंपनीत भारत काळे , जावई बंडू तिखे असा परिवार आहे . ईश्वर त्यांच्या चिर : शांती देवो हि प्रार्थना दशक्रिया विधी सोमवार आत्म्याला दिनांक ७/२/२२ उद्धर रामेश्वर पाली येथे व तेरावा दिनांक १०/२/२२ रोजी राहत्या घरी श्री हरी पार्क रीस येथे होणार आहे .








Be First to Comment