प्रेस फोटोग्राफर चंद्रकांत मुंढे यांना पितृशोक
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी पाताळगंगा परिसरातील प्रेस फोटोग्राफर असणारे चंद्रकांत हसू मुंढे यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर चंद्रकांत मुंढे यांनी समाजसेवक , पत्रकारमित्र यांच्याहस्ते वृक्षारोपण करून आठवण जोपासली आहे.
चांभार्लीं येथील कै.हभप हसूराम दगडू मुंढे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी ते 85 वर्षांचे होते.वारकरी सांप्रदायाचा काळात त्यांनी पंढरपूर, आळंदी पायी चालत वा-या केल्या आहेत.श्री हरीनामाचा उच्चारात ते नेहमीच तल्लीन असायचे. लहानपणापासूनच वृक्षारोपण करण्याची त्यांना आवड असल्याने पर्यावरण वाचविण्यासाठी ते नेहमीच वृक्षलागवड करायचे.वृध्दापकाळाने त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांनी रविवारी राख धुण्याचा कार्यक्रमानंतर प्रेस फोटोग्राफर चंद्रकांत मुंढे यांनी आपले सहकारी पत्रकार मित्र , समाजसेवक यांच्याहस्ते घरासमोरील जागेत चंदन,बेल आदी वृक्षांची लागवड केली.तसेच दोन वर्षांपूर्वी आईंचे निधन झाल्यानंतरही प्रेस फोटोग्राफर चंद्रकांत मुंढे यांच्या कुटुंबीयांनी वृक्षारोपण केले होते.आपल्या आई वडिलांची कायमची आठवण राहावी यासाठी वृक्षारोपण करत असल्याचे चंद्रकांत मुंढे यांनी सांगितले.

दरम्यान कै.हभप हसूराम दगडू मुंढे यांचा दशक्रिया विधी रविवार दि.6 फेब्रुवारी रोजी गुळसूंदे येथे होणार असून उत्तरकार्यं बुधवार दि.9 फेब्रुवारी रोजी चांभार्ली येथील राहत्या घरी होणार आहे.








Be First to Comment