सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
देहेन(भाकरवड), पो. पोयनाड, ता. अलिबाग येथील कॉंग्रेसचे कट्टर समर्थक यशवंत सुदाम जुईकर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले.
वरवठणे (नागोठणे ) येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण म्हात्रे यांचे ते सासरे होते. कै. यशवंत जुईकर यांच्या निधनाने पोयनाड परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या अंतयात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवर, आप्तेष्ट, ग्रामस्थ सहभागी झाले होते.
कै. यशवंत जुईकर यांनी रोहा येथील बॉम्बे डाईंग या कपडाच्या मिल मध्ये नोकरी केली व त्याच मिल मध्ये त्यांनी १९९९ साली निवृत्ती स्विकारली. कै. यशवंत जुईकर यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा देवेंद्र , सून शर्मिला, विवाहित मुलगी हर्षाली, जावई, नातवंडे दुर्गेश, निधी, श्लोक असा परिवार असून कै. यशवंत जुईकर यांची दशक्रिया विधी रविवार दि. ३० जानेवारी रोजी व उत्तरकार्य बुधवार दि. २ फेब्रुवारी रोजी राहात्या घरी होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते नारायण म्हात्रे यांनी दिली.








Be First to Comment