Press "Enter" to skip to content

रिक्षा चालकांची वडघर समाजमंदिरात बैठक

योजना देताना बाधित होत असतील तर नुकसान भरपाई द्या – आनंदा होवाळ

सिटी बेल | कळंबोली |

आता फक्त माझे पोट भरले मला कोणाची गरज नाही या आपल्या स्वार्थी प्रवृत्तीमुळे अनधिकृत कामे, गैप्रकार होत आहेत. आपल्याला आधिकर माहिती नसल्याने राजकीय नेते आपल्याला मूर्ख बनवितात छत्रपती शिवाजी महाराज, महर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव लोकनेते दि. बा. पाटील यांच्यावर होता त्यांनी आधिकराचा योग्य वापर केला म्हणून आज आपण सोने घालून मजा घेत आहोत. तेव्हा आधिकार, कायदे यांचा माहिती होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आनंदा होवाल यांनी करंजाडे येथे केले.

ऑटो रिक्षा चालकांना अनेक समस्या भेडसावत आहे. त्यावर मात कशी करता येईल व वाहतुकीचे नियम याची माहिती मिळावी म्हणून येथील स्थानिक रिक्षा चालकानी विमानतळ पुनर्वसन वसाहतीतील( वडघर) समाजमंदिरात बैठकीचे आयोजन केले होते, ते पुढें म्हणाले पासिंग करताना आगावू रक्कम कधीही देऊ नका. कारण मीटरमध्ये बिघाड झाला तर त्यात रिक्षमालकांचा काय दोष असतो. कंपनीला जबाबदार धरण्यात यावे. आधिकर्यानीच या कंपनीला मीटर पुरविण्याची ऑर्डर दिलेली आहे. असे असताना आपल्याकडून जास्त पैसे का घेतात. त्यांना असे कोणतेही पैसे देऊ नका. त्यासाठी आपल्याला वाहतुकीचे नियम माहिती असणे गरजेचे आहे. असा सल्ला संघटित व्हा असा सल्ला होवाल यांनी दिला.
आपल्या समस्याचे निराकरण व्हायचे असेल तर पहिल्या प्रथम आपण संघटित होणे महत्वाचे आहे. आणि संघटित होण्यामुळे आपले अनेक प्रश्न सुटणार आहेत असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष नरेश परदेशी यांनी केल.

यावेळी इंडियन सोशल मुव्हमेंटचे अध्यक्ष प्रकाश कदम यांनी खंत व्यक्त करत आदिवासी बांधवांच्या योजना कशा फस्त केल्या जातात याची अनेक उदाहरणे दिले. आदिवासी बांधवांना अनेक योजना असून त्या त्यांच्या पर्यंत पोहचू देत नसल्याने ते आगदी वाईट परिस्थितीत जीवन जगत आहेत. शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत आणि त्यात आम्हाला यश येईल असा विश्वास प्रकाश कदम यांनी व्यक्त केला. विमानतळ बाधित रिक्षा चालक मालक संघटनेने आयोजित बैठकीला इंडियन सोशल मुव्हमेंटचा उपाध्यक्षा सविताताई सोनवणे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष नरेश परदेसी, दिलीप नाईक, सुनील भोपी, राम भोईर, विजय केणी,राजेश केणी आदीसह रिक्षा चालक मालक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.