१९ व्या दिवशीही ऐ.जे.ई (बिग कोला) या कामगारांचे आंदोलन सुरुच
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
खालापूर तालूक्यातील पराडे कॉर्नर जवळ ऐ.जे.ई इंडीया प्रा.लिमि.( बिग कोला ) असलेला कारखाण्यातील कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करीत नसल्यामुळे गेले १९ दिवस कामगार चोविस तास तंबू ठोकून आपला निषेध व्यक्त करीत आहे.मात्र व्यवस्थापक योग्य तो निर्णय घेत नसल्याने हा तीडा दिवसेन दिवस आधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे.त्याच बरोबर वातावरणात गारवा निर्माण झाल्याने कामगारांच्या आरोग्याच्या प्रश्न ऐरणीवर येत चालला आहे.
गेली १० वर्ष या कारखान्यात कामगारांना भूल थाप आणी आश्वसानांची खैरात या पली कडे आपल्या काही मिळाले नाही.अल्प पगारामध्ये महिनाभर काम करीत आहोत.आपल्या कामाव्यतिरिक्त कोणतेही काम करवयास भाग पाडत आहे.त्याच बरोबर कोणत्याही सुख सोयी मिळत नाही.मात्र व्यवस्थापक जणू मौन पाळून बघ्याची भूमिका सकारात आहे.असे चित्र पहावयास मिळत आहे.जो पर्यंत कामगारच्या मागणी पूर्ण होत नाही.तो पर्यंत आम्ही आमचे आंदोलन असेच चालू राहील असे अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन ( बाबूराव रामेष्टी ) च्या वतीने युनियनचे प्रतिनिधी यांनी बोलतांना सांगितले.
व्यवस्थापक यांनी कामगारांच्या मागणी पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.मात्र यांना काही सोयर सुतक नाही. सर्व नियम धाब्यावर बसून कामगारंचे मागणी पत्र झुगारून लावत आहे.यामुळे संतप्त कामगारांनी पुन्हा एकदा व्यवस्थापक यांना वठणीवर आण्यासाठी काम बंद आंदोलनाच मार्ग अवलंबला आहे.जो पर्यंत कामगारांना प्रलंबित मागणी यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत काम बंद राहील.असे अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन ( बाबूराव रामेष्टी ) यांच्या वतीने योगेश ठोंबरे,सुर्याजी पाटील, काशिनाथ ठोंबरे,सुरेश गडगे,महेंद्र गडगे,सुधीर गडगे,नरेश गडगे,सुनिल गडगे,सुभाष पाटील अदि कामगारांनी प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले.








Be First to Comment