Press "Enter" to skip to content

इंडियन पोर्ट असोसिएशन सोबत सहा महासंघाची बैठक संपन्न

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

इंडियन पोर्ट असोसिएशन (IPA )च्या व्यवस्थापनाने सहा महासंघाना BWNC च्या झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने नवी दिल्ली येथे द्वि पक्षीय बैठकीमध्ये उपस्थित राहण्यासाठी आमंत्रीत केले होते.

भारतीय पोर्ट एवं डाक मजदूर महासंघाचे(BMS )अध्यक्ष प्रभाकर उपरकर व जनरल सेक्रेटरी सुरेश पाटील तर IPA व्यवस्थापनाचे चेअरमन विनीत कुमार, ऍडव्हायजहर – आर डी त्रिपाठी, एम डी -अरविंद चौडे सदर बैठकीस उपस्थित होते.या बैठकीत भारतीय मजदूर संघाच्या वतीने विविध विषयावर BMS चे अध्यक्ष प्रभाकर उपरकर, जनरल सेक्रेटरी सुरेश पाटील यांनी आपली बाजू IPA च्या अधिकाऱ्यांसमोर मांडली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

MPA ऍक्ट 2021(major port authority act 2021)नुसार भारतातील सर्व बंदरात कामगार विश्वस्त हा कामगार असला पाहिजे. सदर कामगार विश्वस्त हा निवृत्त कामगार किंवा बाहेरचा नसावा. भारतातील सर्व बंदरात निवडणूक प्रक्रिया ही गुप्त पद्धतीने झाली पाहिजे. एकूण सहा फेडरेशनचे (संघटनाचे )विचार ऐकल्यानंतर पोर्टनुसार 55%- 45% उत्पादकता गुणोत्तर सध्याच्या 2021 साठी PLR(बोनस ) देण्याचे व्यवस्थापनाने चर्चेत मान्य केले.BWNC च्या निवडीच्या प्रक्रियेस विलंब होत आहे या विषयावर BWNC ची लवकरच बैठक घेऊन शिपिंग मंत्रालयाशी लवकरच संपर्क साधला जाणार असल्याचे IPA च्या व्यवस्थापनाने BMS च्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

1/10/2021 ते 30/6/2021 दरम्यान VDA /DA गोठवीण्या संदर्भात व्यवस्थापनाने मंत्रालयाशी चर्चा करून सौदार्हपूर्ण तोडगा काढण्याचे तसेच CCS पेन्शन रुल 1972 नुसार पेन्शन नियमन आणि शिफारशी बाबत सेक्रेटरी (मंत्रालय बंदरे व जहाज बांधणी आणि जलमार्ग )यांच्याशी बैठक लावून देण्याचे IPA च्या अध्यक्षांनी मान्य केले. मुंबई बंदर, गोवा बंदर अध्यक्षांशी चर्चा करून विलंब न करता मुंबई गोवा पोर्ट ट्रस्ट कामगार आणि पेन्शन धारकांना मागील थकबाकी, पेन्शन देण्यासाठी योग्य ती कारवाई करू असे आश्वासन IPA च्या व्यवस्थापण कमिटीने BMS च्या पदाधिकाऱ्यांना दिले.जे एन पी टी बंदरातून सुरेश पाटील हे एकमेव असे कामगार नेते व BMS चे पदाधिकारी सदर बैठकीला उपस्थित होते.भारतातील बंदरातील विविध समस्या सोडविण्यासाठी BMS चे जनरल सेक्रेटरी सुरेश पाटील हे विशेष प्रयत्न करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.