विशाल निंबाळकर यांची उपतालुका कामगार संघटकपदी निवड
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी कामगार सेनेच्या खालापूर तालुका एमआयडीसी क्षेत्रात उपतालुका संघटकपदी विशाल विजय निंबाळकर यांची नेमणूक करण्यात आली असून ही नेमणूक एका वर्षांकरिता राहणार आहे.
मराठी कामगारांना खंबीर नेतृत्वाची गरज असून त्यांची विश्वासार्हता जपणे सर्वांत महत्त्वाची जबाबदारी आहे.ही जबाबदारी खालापूर तालुक्यात सांभाळण्यासाठी मराठी कामगार सेनेच्या उपतालुका कामगार संघटक पदावर विशाल विजय निंबाळकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे.विशाल सारखा होतकरु तरुण नक्कीच मराठी कामगारांच्या अस्तित्वावर आवाज उठलेलं यात तिळमात्र शंका नसल्याचे मनसेचे पनवेल तालुका अध्यक्ष अविनाश नारायण पडवळ यांनी बोलताना सांगितले.विशाल निंबाळकर यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment