भरत बाळूशेठ पाटील यांचे दुःखद निधन : माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांना पितृशोक
सिटी बेल | वहाळ |
सिडको कामगार युनियन चे माजी अध्यक्ष भरत बाळूशेठ पाटील यांचे सोमवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.मंगळवारी सकाळी वहाळ या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.भरत बाळूशेठ पाटील हे पनवेल चे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांचे वडील.तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजेंद्र पाटील यांचे ते काका आहेत. मृत्यू समयी त्यांचे वय ७२ वर्षे होते.
कामगार क्षेत्रातील एक खमके नेतृत्व म्हणून भरत शेठ प्रसिद्ध होते.अखेरपर्यंत त्यांची नाळ कामगारांशी जोडली गेली होती.१९८७ ते १९९२ त्यांनी सिडको कामगारांच्या युनियन चे अध्यक्ष पद भूषविले. तत्पूर्वी १० वर्षे त्यांनी उपाध्यक्ष पदावर उत्तम कामगिरी बजावली.दि बा पाटील यांचे समर्थक म्हणून दिबांच्या एका इशाऱ्यावर भरत पाटील सिडको मुख्य कार्यालय बंद करून दाखवत असत.सिडको कर्मचाऱ्यांना चौथा वेतन आयोग मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.तसेच कामगारांच्या सोसायटी ला भूखंड मिळवून देण्याचे श्रेय देखील भरतशेठ यांनाच जाते.
वैयक्तिक आयुष्यात सांगित साधनेत रमणाऱ्या भरत शेठ यांनी कामगार क्षेत्राच्या सोबतच समाजिक,राजकीय संस्कृतिक क्षेत्रात देखील स्वतःचा ठसा उमटवीला. ते उत्तम हार्मोनियम वादक म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते.वहाळ विविध कार्यकरी सहकारी सोसायटी चे ते २० वर्षे चेअर मन होते.त्यांच्या संघटन कौशल्यामुळे अनेक विघ्नसंतोषी नेत्यांना त्यांनी आसमान दाखविले.सिडको युनियन तोडण्याचे अनेक प्रयत्न झाले.परंतु भरत पाटील यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास असणाऱ्यांनी विरोधकांचे मनसुबे उधळून लावले.
त्यांच्या पश्चात माजी रायगड जिल्हा परिषद सदस्या असणाऱ्या पत्नी सुरेखा,मुले संदीप व सुनील,बोकड विरा ग्राम पंचायती ची दोन वेळा सरपंच झालेली कन्या,सुना,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या अंत्ययात्रेसाठी समाजातील विविध स्तरातील मान्यवर सहभागी झाले होते.आमदार प्रशांत ठाकूर,आमदार बाळाराम पाटील,माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे,प म पा चे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे,सभागृह नेते परेश ठाकूर,ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील,ह भ प महादेव बुवा शहाबाजकर यांच्या सह हजारो नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले.ईश्वर भरत पाटील यांना सद्गती प्रदान करो ही प्रार्थना.








Be First to Comment