राज्यातील भूमीहीन शेतकऱ्यांसाठी भिमशक्तीचे ५ नोव्हेंबरला मुंबई येथे आंदोलन
गोपाळ तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन
सिटी बेल| पेण | वार्ताहर |
महाराष्ट्रातील तत्कालीन सरकारने राज्यातील भूमीहीन शेतकऱ्यांसाठी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना तर आदिवासी समाजातील वंचित घटकांकरीता आदिवासी सबळीकरण स्वाभिमान योजना या दोन्ही योजना मागासलेल्या घटकांकरीता सुरू केल्या मात्र मध्यांतरी या योजनांपासून अनेक शेतकरी वंचित राहिलेले आहेत.
त्यामुळे शासनानी सदर योजना तात्काळ सूरू करावी याकरीता संघटनेच्या माध्यमातून अनेकदा पत्रव्यवहार केले परंतु याकडे अधिका-यांसह सरकारनेही कानाडोळा केला असल्याने आता भूमीहीनांना न्याय मिळवून देण्यासाठी भिम शक्तीचे प्रदेश सरचिटणीस गोपाळ तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ५ नोव्हेंबर रोजी राजभवन मुंबई येथे हजारों भूमीहीनांच्या उपस्थित आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री तसेच संबंधित मंत्री व अधिकारी यांना देण्यात आले आहे.
सदर निवेदनाद्वारे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावतीसह इतर जिल्ह्यांतील असणारे २०१८ चे प्रलंबित प्रकरणे मंजूर करावे, आदिवासीच्या भूमीहीन शेतकऱ्यांचे प्रकरण तात्काळ करावे, बागायती जमीन प्रती एकर ८ लाख आणि झिरायती ५ लाख रुपये भाव आहे त्यात वाढ करून आदिवासी समाजाचे सबलीकरण करावे, अनुसूचित जातीच्या दाखल्यांसाठी १९५० ची रद्द करावी यासह शासनाच्या या सबलीकरणाची माहिती काहीं जिल्ह्यातील अधिकारी लाभार्थ्यांना खोटी सांगतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासह अन्य काही मागण्यांसाठी भिम शक्ती संघटनेच्या माध्यमातून ५ नोव्हेंबर रोजी राजभवन येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सबलीकरण योजनेचे प्रचारक उमेश लांगी आणि आदिवासी विकास सबलीकरण राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे रायगड अध्यक्ष लक्ष्मण निरगुडा यांनी पेण येथे सांगितले आहे.











Be First to Comment