Press "Enter" to skip to content

मुसळधार पावसात हजारो शिवभक्तांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास जलाभिषेक

खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, माजी खा. शिवाजी माने, आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती

सिटी बेल | नांदेड – वसमत | राहूल बहादूरे |

वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आगमनाप्रसंगी मिरवणुकीमध्ये घडलेल्या निंदनीय प्रकारामुळे तमाम शिवभक्त, शिवप्रेमी, शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.सोशल मीडियातून टीकेची झोड उठल्या नंतर ६०० शिवभक्त व खासदार हेमंत पाटील व उपस्थित नसलेल्या अनेक शिवभक्तांवर राजकीय हेतूने गुन्हे दाखल करण्यात आले.

यासंदर्भांत खासदार हेमंत पाटील व आ. संतोष बांगर हे पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात स्वतःहून अटक करून घेण्यासाठी गेले होते. याप्रसंगी शिवभक्तांवरील गुन्हे येत्या आठ दिवसात मागे घेऊ असे शब्द पोलीस अधीक्षकांनी दिल्यामुळे पुतळ्यावर चढून विटंबना केल्याच्या भावना शिवभक्तांमध्ये उमटत होत्या. शिवभक्तांच्या भावना अनावर होऊ नये म्हणून पंच नद्यांच्या जलाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा जलाभिषेक करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यात नांदेडवरून उत्तर चे आ. बालाजी कल्याणकर हे गोदावरीचे पाणी, आ. संतोष बांगर यांनी कयाधुचे पाणी, माजी खा. शिवाजी माने यांनी पैनगंगेचे पाणी आणले तर खासदार हेमंत पाटील यांनी आसना आणि वसमत तालुका प्रमुख राजू चापके यांनी पूर्णेचे पाणी या जलाभिषेकासाठी घेऊन आले होते.

सकाळी ८ वाजेपासून हजारो शिवप्रेमी पुतळा परिसरात जमा व्हायला सुरवात झाली होती. जय जिजाऊ. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज कि जय या गगनभेदी घोषणेने आणि शिवभक्तांच्या स्वयंस्फूर्त जमावाने संपूर्ण वसमत शहर भगवेमय झाले होते. कळमनुरी तालुक्यातील पूरपरिस्थतीची पाहणी करून खासदार हेमंत पाटील आ. संतोष बांगर हे सकाळी १० च्या सुमारास वसमत येथे दाखल झाले. माजी खासदार शिवाजी माने त्यांच्याबरोबर होते. खरे पाहता शिवभक्तांसमोर येऊन संतप्त प्रतिक्रिया येत असताना खासदार हेमंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांमध्ये आ. राजू नवघरे यांच्याकडून अनावधानाने हे कृत्य झाले आहे याचे कोणीही राजकारण करू नये असे आवाहन शिवभक्तांना आणि शिवसैनिकांना केले होते, परंतु दोन दिवसानंतर मला वर चढत असताना खासदार पण चढवण्यावर होते असे खोटेनाटे आरोप वृत्तपत्रात प्रकशित झाले तसेच दोन दिवसानंतर खासदार हेमंत पाटील व इतर ६०० शिवभक्तांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

त्यामुळे शिवभक्त व शिवसैनिकांच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या होत्या. उलटा चोर कोतवाल को डांटे या न्यायाने चुकीची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून राष्ट्रवादीच्या आमदाराच्या सांगण्याने शिवसैनिकांना बघून घेऊ अश्या स्वरूपाच्या चित्रफीत डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या क्लिप प्रसारमाध्यमांवर प्रसारीत झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. सकाळी १० वाजता मुसळधार पावसाला सुरवात झाली. यावेळी काही जण हालचाल करत आहेत हे पाहून छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वतःच्या छातीवर तलवारीचे वार घेऊन महाराष्ट्र धर्म राखला , महिलांची अब्रू राखली मंदिरे भ्रष्ट होण्यापासून वाचविली अश्या मर्द मावळ्यांचे आपण वंशज असून पाळपुट्यांचे नाही असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केल्यामुळे हजारों शिवभक्तांचा जनसमुदाय जागेवर बसून राहिला.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असलेले माजी खासदार शिवाजी माने यांनी आपले मत व्यक्त करताना पुतळा बसविण्यासाठी देणग्या देणाऱ्यांचा व त्यांच्या निवडणुकीपासून आताच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रत्येक निवडणुकीत माजी सहकार मंत्री यांनी कशी गद्दारी केली याचा पाढाच वाचून दाखवला. आमदार राजू नवघरे हे ढोंगी असून शिवसैनिकांनीच नाही तर संभाजी ब्रिगेड आणि पत्रकारांनी पाकिटे घेऊन माझ्या विरोधात बातम्या छापून आणल्याचा आरोप जाहीरपणे केला होता हे सर्व खोटे असून, हिंगोली जिल्ह्यातील कोणताही पत्रकार विकाऊ नाही, असे जाहीरपणे आ. संतोष बांगर यांनी सांगितले. वृत्तपत्रामध्ये झालेल्या बातमीमध्ये आ. नवघरे यांना वर चढवतानाचा उल्लेख केला आहे असे फोटो किंवा चित्रफीत असेल तर दाखवा आयुष्यभर दाढीमिशी काढून राजकारणातून संन्यास घेईन असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले. खासदार हेमंत पाटील, माजी खा. शिवाजी माने,आ. संतोष बांगर आ. बालाजी कल्याणकर, श्रीनिवास पोरजवार , सुनील काळे, राजू चापके, अंकुश आहेर, यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा जलाभिषेक कऱण्यात आला.

या प्रसंगी निसर्गानेही आकाशात सारी बरसवून जलाभिषेक केला. याप्रसंगी मान्यवरांनी केलेल्या स्फूर्ती भाषणाने उपस्थितांनाच्या अंगावर रोमांच उभे राहत होते अश्या जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शिवरायांचा जलाभिषेक सोहळा पार पडला. यावेळी जमलेल्या तमाम शिवभक्तांच्या नाश्त्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तालुकाप्रमुख राजू चापके व वसमत येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली होती.

यावेळी जि. प. अध्यक्ष गणाजी बेले, सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे, जि. प.समाजकल्याण सभापती फकिरराव मुंढे, युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,जि. प.सदस्य विठ्ठल चौतमल, नंदकिशोर खिल्लारे, श्रीशैल्य स्वामी, प्रल्हादराव राखोंडे, उपजिल्हाप्रमुख सुनीलभाऊ काळे,परमेश्वर मांडगे, संदेश देशमुख, राजेश इंगोले, तालुका प्रमुख राजु चापके, अंकुश आहेर, भानुदास जाधव, नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार, शहरप्रमुख काशिनाथ भोसले, कय्युम शेख, किशोर मास्ट,बगुड्डू भाऊ बांगर,मयूर शिंदे,शिवराज पाटील, अजिंक्य नागरे, खली बांगर, शंकर यादव, बाबा अफूने, चेतन बांगर, बालाजी बांगर,गोपाळ बांगर यांच्या सह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.