अज्ञात व्यक्तीने पेटविली सोयाबीनची गंजी : डोळ्यासमोर अख्खे पिक जळताना पाहून शेतकऱ्याने फोडला हंबरडा !
सिटी बेल | हदगाव | राहुल बहादूरे |
हदगाव शिवारातील शेतकरी लक्षमन अंबाजीराव डुरके शेत सर्वे न.१३९/३शिवचे हा असुन त्यांच्या शेतात सोयाबीन पिक होते सोयाबीन गंजी लावुन ठेवली होती सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान अज्ञात इसमानी सोयाबीन गंजी पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे.सदर घटनेची बातमी शेतकऱ्यांना कळताच शेतकऱ्याने हंबरडा फोडत दुःख व्यकत केले व तहसील तथा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली.

त्यामध्ये नमद केले की, प्रशासनानी तात्काळ पंचनामा करुन त्यांचे निकष ठरवावे तसेच शेता शिवाय कोणतेही प्रकारचे उत्पादनाचे साधन नसल्यामुळे सदर पिडीत शेतक-यांवर फार मोठे संकट उभे टाकले असुन प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.








Be First to Comment