हदगाव पोलीस स्टेशनच्या कारवाईत निवघा (बा) येथे ८४ हजार रुयाचा गुटखा जप्त
सिटी बेल | हदगाव | राहुल बहादूरे |
राज्य शासनाने बंदी घातलेला गुटखा निवघा बाजार परीसरात सर्रास खुलेआम विक्री केल्या जातो तर येथील काही दुकानातून परीसरातील खेडयापाड्यात गुटख्याचा पुरवठा केला जातो. याची कुणकुण हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हुनुमंत गायकवाड यांना लागली या मुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी संयकाळी चार ते पाच च्या दरम्यान निवघा बाजार येथील प्रसिद्ध असलेल्या गजानन गोळी भांडार वर छापा मारून विविध कंपनीचा ८४ हजार शंभर रूपयाचा गुटखा जप्त केल्याची माहीती पोलीस निरीक्षक यांचे मुन्सी पांचाळ यांनी दिली.
निवघा बाजार येथील काही निवडक दुकानात गुटख्याचा साठा करुन परीसरातील खेडयापाडयात दुचाकी द्वारे पुरवठा केला जातो. बुधवार रोजी हदगाव च्या पोलीस पथकाने तीन दुकानावर चौकशी केली असता एका दुकानवर गुटख्याचा माल आठळून आल्याने ८४ हजार शंभर रूपयाचा माल जप्त केला असून सदर गुटखा विक्रेत्या प्रकाश रामराव काकडे रा. निवघा बाजार यांच्या विरूद्ध स.पो.नि. संजयकुमार गायकवाड यांच्या फिर्यादीवरून हदगाव ठाण्यात रात्री ९:०० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई हदगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ.नि. फोलाने, पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ हबंर्डे, पोलीस कॉन्स्टेबल चिंतले, पोलीस कॉन्स्टेबल जयंत पाईकराव, पो.कॉ.जेठण पांचाळ, पो.कॉ. लक्षमन गाडे यांनी ही धाडशी कारवाई केली. या कारवाई मुळे इतर गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणानले आहेत.








Be First to Comment