Press "Enter" to skip to content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुखेड तालुका कार्यकारणी जाहीर

तालुकाध्यक्षपदी आसद बल्खी तर सचिवपदी भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांची निवड

सिटी बेल | मुखेड – नांदेड |

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, नांदेड जिल्हा अध्यक्ष संजीवकुमार गायकवाड व जिल्हा संघटक विशाल पवार, जिल्हा संपर्क प्रमुख अनंत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, मुखेड तालुक्याची मागील कार्यकारणीची मुद्दत संपल्यामुळे मुखेड तालुक्यातील सामाजिक राजकिय, शेतकरी व जनसामान्यांच्या प्रश्नावर काम करत शोषित वंचीत व पिडीतांना लेखणीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न व समस्या प्रशासना पर्यंत पोहचवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना मुखेड तालुक्यात कार्यरत असून नूतन कार्यकारणीसाठी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पत्रकारांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीच्या सुरुवातीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे बेटमोगरेकर, नूतन तालुकाध्यक्ष आसद बल्खी, सहसचिव मोहम्मद रफीक यांच्या हस्ते संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार भारत सोनकांबळे यांनी केले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मुखेड तालुक्याची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे :

तालुकाध्यक्ष आसद भाई बल्खी, उपाध्यक्ष विठ्ठल कल्याणपाड, सचिव भारत सोनकांबळे बेटमोगरेकर, कार्याध्यक्ष मोतीपाशा पाळेकर, सहसचिव मोहम्मद रफीख, प्रसिद्धीप्रमुख रवी सोनकांबळे, सदस्य चंद्रकांत राजूरकर आदींची यावेळी निवड करण्यात आली.

प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ मुखेड तालुका नूतन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल मुखेड तहसीलचे तहसीलदार मा.काशिनाथ पाटील, पेशकार गुलाब शेख निवडणूक शाखेचे सहाय्यक संदीप भुरे, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राजेश पद्मवार, संतोष वाघमारे, अविनाश कांबळे, श्री वैद्य, तसेच फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते मा.दशरथराव लोहबंदे, प्रहार संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ वड्डेवार, एपीजे अब्दुल कलाम मित्रमंडळाचे एस. के. बबलू, इमरान आतार, जयप्रकाश कानगुले, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष कपिल कांबळे जुन्नेकर, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष गंगाधर सोंडारे, ॲड. संजय भारदे, बामसेफचे पि.के. गायकवाड, आदींसह विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, संघटक साहेबराव कोळंबिकार, राज्य, विभागीय, जिल्हा, तालुका पदाधिकारी व सभासदांनी नूतन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.