Press "Enter" to skip to content

हदगावमध्ये कडकडीत बंद

महाविकास आघाडीतर्फे हदगाव बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद : दिवसभर तालुक्यातील बाजारपेठ कडकडीत बंद

सिटी बेल | हदगाव |

उत्तर प्रदेशांतील लखीमपूर खेरी येथे भाजपाच्या केंद्रीय मंत्री यांच्या मुलाकडून शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडून ठार मारण्याच्या घटनेच्या निषेधार्थ व शेतकऱ्यावरील दडपशाही निषेधार्थ आज दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सोमवार महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या वतीने हदगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते.

या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा रुग्णालय औषधालय आवश्यक वस्तूंची वाहतूक वगळता हदगाव शहरातील सर्व स्थापना बंद ठेवण्यात आल्या तसेच व्यापाऱ्यांनी आस्थापने दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दर्शविला. तरी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकऱ्याने बंद मध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा असे आवाहन हदगाव काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष आनंदराव भंडारे, शिवसेना तालुकाप्रमुख श्यामराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष वसंतराव देशमुख, महाविकास आघाडी हदगाव यांच्या कडून बंद होते.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. मागील अनेक महिन्यांपासून देशाच्या कानाकोपऱ्यात शेतकरी आंदोलने होत आहे. पण केंद्र सरकार शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यायला तयार नाही. केंद्र सरकारने लोकाभिमुख निर्णय घेण्याची गरज आहे. परंतु, त्याऐवजी एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भरधाव वाहनाखाली चिरडले जाते. या घटनेतील पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी लखीमपूर खेरीला जाणारे खा. राहुल गांधी, प्रियंका गांधी सारख्या विरोधी पक्षातील नेत्यांना बळाचा वापर करून रोखले जाते, त्यांना अटक केली जाते.

हा संपूर्ण प्रकार शेतकऱ्यांचा आणि विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. ही दडपशाही लोक सहन करणार नाहीत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाविकासआघाडी ने ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता. नागरिकांनी सुद्धा शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून या आंदोलनाला सहकार्य करून हदगाव शहर व्यापारानी कडकडीत बंद ठेऊन या बंदला उस्फुर्त प्रतिसाद दिला.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद भंडारे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव पाटील हरडफकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील बाभळीकर, युवा काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष कादिर खान, हदगाव नगरपालिका उपाध्यक्ष सुनीलभाऊ सोनुले, माजी नगरपालिका अध्यक्ष तथा गटनेते अमित अडसूळ,माजी नगरसेवक आनंद कांबळे, माजी नगरसेवक बालाजी राठोड, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळ पवार, मागासवर्गीय सेल शहराध्यक्ष अक्षय कांबळे, विद्यमान नगरसेवक फिरोज पठाण, नगरसेवक विनोद राठोड, सिताराम पाटील फळीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडू खंदारे, शिवसेना तालुका प्रमुख शामराव चव्हाण, ज्येष्ठ शिवसैनिक अवधूत देवसरकर, जिल्हा परिषद सदस्य गजानन गंगासागर (शिवसेना), नगरसेवक बाळा माळोदे (शिवसेना), नगरसेवक किशोर भोस्कर (शिवसेना), राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक वसंतराव देशमुख, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अभिजीत रुद्रकंठावार,युवा काँग्रेस तालुकाध्यक्ष अमोल कदम रुईकर सह तालुक्यातील शेतकरी वर्ग व महा विकास आघाडीतील असंख्य कार्यकर्ते हजर होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.