Press "Enter" to skip to content

शिवा संघटनेची निवेदने

शिवा संघटनेच्या मागणी बाबत शासन सकारात्मक : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांना साकडे

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

श्रीक्षेत्र भक्तीस्थळ ते तिर्थक्षेत्र कपिलधार मार्गास श्री मन्मथ-शिवलिंग पालखी मार्ग असे नामकरण करण्यात यावे.मांजरसुंबा ते कपिलधार 5 किमी घाटरस्ता ओव्हर ब्रीज बांधुन त्यास महामार्गास जोडावा.श्रीक्षेत्र भक्तीस्थळास तिर्थक्षेत्रास ब वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा द्यावा.ओबीसीनां स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुर्ववत आरक्षण देणे.कोरोना काळात किर्तनकारांना पाच हजार रुपये मानधन देण्याचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या घोषणे प्रमाणे वीरशैव सांप्रदायातिल किर्तनकार, प्रवचनकार, गायक-वादक यांनाही सदर योजना लागु करुन 5,000 रुपये मानधन द्यावे आदी विविध मागणीबाबत शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष वीरशैव-लिंगायत ह्रदयसम्राट प्रा.मनोहरजी धोंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे ,उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार व राज्याचे नगरविकास व सा.बां.मंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन या सर्व मागण्या मान्य करण्यात यावे याबाबत निवेदन दिले आहे.

या विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित मंत्री महोदयांनी दिले आहे. ओबीसीनां स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुर्ववत आरक्षण देणे याबाबत या मुद्द्यावर मा. सर्वोच्च न्यायालयातील ईम्पिरिकल डाटा मिळणे बाबतची याचिका, केंद्र सरकार कडुन ईम्पिरिकल डाटा मिळविणे व राज्य मागासवर्गीय आयोगाकडुन ईम्पिरिकल डाटा जमा करणे अश्या तिन आघाडयावर राज्य सरकार चे काम युध्द पातळीवर चालु असुन ओबीसी ना लवकरच आरक्षण दिले जाईल असे स्पष्ट आश्वासन शिवा संघटनेच्या शिष्टमंडळाला अजितदादा यांनी दिले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,मंत्री एकनाथ शिंदे यांनीही सकारात्मक भूमिका घेत शिवा संघटनेच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी शिवा संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष-शिवा बीराजदार, विनायक म्हमाने- रायगड जिल्हाध्यक्ष, आनंदराव गुजर-संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा दत्ता पाटिल -शहराध्यक्ष पनवेल, मल्लिकार्जुन डब्बे-शहराध्यक्ष ठाणे, प्रसाद महाजन, मनोज डोंगरे, सुनील लाठे, बसवेश्वर धोंडे आदि शिवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.