Press "Enter" to skip to content

रोह्यात नवरात्रोत्सवाची धुम

रोह्याचे आराध्यदैवत श्री धाविर महाराज व धाटावचे सोनारसिद्ध महाराज यांच्यासह गावोगावी ग्रामदैवतेची घटस्थापना

सिटी बेल | धाटाव | शशिकांत मोरे |

आश्विन शुक्ल प्रतिपदेच्या मुहूर्तावर रोह्याचे आराद्यदैवत श्री धाविर महाराज व धाटावगावचे ग्रामदैवत श्री सोनारसिद्ध महाराजांची ग्रामस्थांच्या साक्षीने आज घटस्थापना करण्यात आली.दरम्यान झालेल्या स्थापनेने आज पासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला.दरम्यान या नवरात्र उत्सवानिमित्त गावातील वातावरण भक्तिमय झाल्याने ग्रामस्थांमधेही उत्साह पहावयास मिळाला.

कोरोनाचा प्रादुर्भाव स कमी होत असल्याने काही प्रमाणात शासनाने निर्बंधात शिथिलता दिल्यानंतर महाराष्ट्रातील बहुतांशी देव देवतांची मंदिरे उघडण्यात आली असल्याने आज रोहेकरांचे आराध्य दैवत असलेल्या धावीर महाराजांची व धाटावगावचे ग्रामदैवत श्री सोनारसिद्ध महाराजांची ग्रामस्थांच्या साक्षीने आज कोरोना बाबत सर्व नियम पाळून मंदिरात घटस्थापना करण्यात आली.

धाविर महाराज की जय,श्री सोनारसिद्ध महाराज की जय अशा जयघोषात विधिवत पूजाअर्चा महाआरती झाल्यानंतर ग्रामदेवत आज घटी बसले.मंदिरात ग्रामस्थानि केलेल्या जयघोषाने सबंध परिसर दणाणुन गेला होता.दरम्यान ग्रामदैवतेच्या घटस्थापना कार्यक्रमाला गावातील जेष्ठ,श्रेष्ठ मंडळीसह तरुण वर्गाचा व महिलांचा सक्रीय सहभाग आणि उत्साह आनंद घेणारा होता.
झालेल्या घटस्थापनेने नवरात्रोत्सवालाही प्रारंभ झाला.धाटाव मधे सुरू झालेल्या नवरात्रोत्सवात विविध सांस्कृतिक,कला गुणात्मक तर दांडिया(गरबा)नृत्य सुद्धा खेळले जाणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.