नागोठणे कुंभार आळी मराठा आळी नवरात्र नवरात्रौत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम चे आयोजन
सिटी बेल | नागोठणे | याकूब सय्यद |
सालाबाद प्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव सर्वत्र राज्यात भरात साजरा केला जात आहे . तसेच सालाबाद प्रमाणे नागोठणे कुंभार आळी मराठा आळी येथील देखील नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला येत आहे.
हा नवरात्र उत्सव साजरा होत असताना गरबा सणानिमित्ताने श्री कानिफनाथ मंदिरात नवरात्र उत्सव मध्ये दररोज संध्याकाळी आरती नऊ दिवस तसेच गरबा नृत्य आळीतील महिलांसाठी होम मिनिस्टर चा कार्यक्रम लहान मुलां मुलींसाठी फनी गेम्स शिव चारित्रावर प्रतीक पाटणकर यांचे व्याख्यान व प्रफुल नागोठणेकर व सहकाऱ्यांचे सुश्राव्य संगीत भजन गरबा प्रेमींसाठी फॅन्सी ड्रेसचे आयोजन तसेच सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन तसेच सामाजिक सांस्कृतिक व स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन तसेच नवरात्र उत्सव कमिटी ने प्रतिष्ठित नागरिकांची सत्कार कार्यक्रमाचे देखील आयोजन केले होते.

नवरात्र उत्सव गरबा कार्यक्रम आयोजक मंडळ श्री कानिफनाथ नवरात्र उत्सव मंडळ कुंभार आळी व मराठा आळी अध्यक्ष विपुल हेंडे, उपाध्यक्ष अक्षय नागोठणेकर, सेक्रेटरी नीरज नागावकर, खजिनदार मयूर वाघमारे, कार्याध्यक्ष संतोष नागोठणेकर, गणेश बिरवाडकर, सल्लागार उदय लाड, राकेश चितळकर, मंडळाचे आधारस्तंभ किरण लाड, रुपेश नागोठणेकर, संकेत लाड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ बंधू-भगिनींनी विशेष परिश्रम घेतले.








Be First to Comment