त्रिभुवनसुंदरी
त्रिभुवनसुंदरी जगन्माऊली आली धरती वरी
भवानी आली धरतीवरी
(आली सत्वर घेऊन घागर करू जागर)||धृ||
हिरवी साडी चोळी नेसली अष्टभुजा देवी
सप्तहाते शस्त्र घेऊनी शुभ आशिषा देई
प्रेमळ आमची माय भवानी दिसते हो साजरी ||१||
नऊ दिवस नऊ रात्री भक्तीचा सागर
खेळू भोंडला फेर धरू या
करूया जय जय कार
नवोन्मेष धारिणी तू वरदा सुफला धरती करी ||२||
कधी चंडी कधी काली तू राजराजेश्वरी
सद्भक्तिभावे विनवू तिजला आम्ही लेकरे सारी
मस्तक नमवुनी नमन करूया माते वरदेश्वरी ||३||
आज मातले दैत्य फार हे अंध:कार झाला
निर्दालन कर सत्वर त्यांचे ने सन्मार्गाला
तुला प्रार्थितो तुला विनवितो तूच माऊली खरी ||४||
सौ.सुजाता खरे., नवीन पनवेल
Be First to Comment