सिटी बेल | हदगाव |
केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे राज्यकर्मचाऱ्यांना ही दिवाळीपूर्वी महागाई भत्याची व फरकाची रक्कम देण्यात यावी अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे तालुका सचिव अनिल दस्तूरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात दस्तूरकर यांनी म्हटले आहे की, केंद्रीय कर्मचाऱ्यांपेक्षा राज्यकर्मचाऱ्यांना ११ टक्के महागाई भत्ता कमी असल्याचे सांगून दिवाळीपूर्वी केंद्रीयकर्मचाऱ्यांना अजूनही काही टक्के महागाई भत्ता वाढवून व दिवाळीपूर्वी फरकाची रक्कम मिळणार असल्याचे माध्यमातून वाचण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तरी राज्यकर्मचाऱ्यांना व निवृत्तीधारकांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळीपुर्वी महागाईभत्ता व फरकाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणीमराठवाडा शिक्षक संघाचे तालुका सचिव अनिल दस्तूरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदनाद्वारे केली आहे.








Be First to Comment