उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्ततपासणी विभागामुळे रुग्णची होत असलेली हेळसांड थांबवा – बाला पाटील
सिटी बेल | हदगाव |
हदगावातील उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्ततपासणी विभागात येणाऱ्या रुग्णांना रक्त तपासणीचा रिपोर्ट अंदाजे तीन ते चार दिवसानंतर मिळत असल्याचे व रुग्णांनाही हीन दर्जाची वागणूक मिळत असल्याची तक्रार भाजपा शहराध्यक्ष बाळा पा. कदम यांना भेटल्यानंतर त्यांनी थेट वैद्यकीय अधीक्षक यांना भेटून रुग्णांना येणाऱ्या अडचणीचा जाब विचारला व यापुढे रुग्णांची होत असलेली पिळवणूक न थांबवली तर आपल्या रुग्णालय पुढे आंदोलन करण्यात येईल असे आशयाचे निवेदन अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हदगाव यांना देण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील असंख्य रुग्ण येत असतात, परंतु या रुग्णालयात असलेली रक्त तपासणी विभाग मधील रिपोर्ट कधीच वेळेवर मिळत नाही. रुग्णांना या रिपोर्ट साठी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागते आजाराचे निदान वेळेवर होत नसल्याने आजार वाढत असून जीव धोक्यात जात आसल्यामुळे रुग्णांचा कल खाजगी रुग्णालयात जाऊन रक्त तपासणी करण्यासाठी वाढला आहे त्यामुळे आर्थिक भुर्दंडना पण समोर जावे लागते.
तरी लॅब योग्य ती कार्यवाही करून दुसन्या लॅबला कंत्राक्ट दण्यात यावा जर आपण आपल्या स्तरावरुन सदर प्रकरणाची चौकशी करून रुग्नांना रक्त तपासण्यासाठी योग्य सुविधा व रक्त रिपोर्ट वेळेवर देण्यासाठी प्रयत्न केले नाही तर नाइलाजास्त आपल्या रुग्णालयापुढे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन भारतीय जनता पार्टी हदगाव शहर अध्यक्ष बाला पाटील कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.








Be First to Comment