Press "Enter" to skip to content

प्रगती दलाल “मी मराठी, महाराष्ट्र गौरव” पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

पनवेल येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या केशवजी विरजी कन्या विद्यालय गेल्या ३२ वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या विज्ञान वादी ज्येष्ठ शिक्षिका ,आदरणीय प्रगती प्रदीप दलाल यांचा, मराठी पत्रकार संघ ,पत्रकार भवन, मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते “मी मराठी, महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२१” ने सन्मानित करण्यात आले .

प्रगती दलाल या गेल्या ३२ वर्षांपासून ज्ञानदानाच्या कार्याबरोबर रोटरी क्लब च्या स्वयमसिद्धा अंतर्गत समाजसेवा ही करत आहेत. स्वयमसिद्धा च्या माध्यमातून त्यांनी आदिवासी लोक वस्ती, बेघर कुटुंब यांची आर्थिक व वस्तू रुपात सेवा केलेली आहे. शैक्षणिक क्षेत्रात विज्ञान विषयात त्यांना आवड असल्यामुळे वैज्ञानिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास अग्रेसर आहेत. त्यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रकल्पाला तालुका , जिल्हा व राज्य स्तरावर निवड झालेली आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘हिंदवी स्वराज्य संघटना ‘ काळाचौकी मुंबई यांचे अध्यक्ष प्रकाश जाधव व सचिव सुरज भोईर यांनी पुरस्कारासाठी निवड करून त्यांच्या कामाला योग्य न्याय दिला .

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विद्याताई चव्हाण, मराठी सिने-नाट्य अभिनेत्री जुई गडकरी, होप फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रविण निचत,चित्रपट निर्माते राज पटेकर, सिद्धिविनायक मंदिराचे विश्वास्त आरती साळवे, उद्योजिका संगीता गुरव ,विशाल हिवाळे शमिका दळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा समितीचे सभापती व शिक्षक आमदार बाळाराम पाटील ,शाळा समिती सदस्य व पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे ,शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व सेवक वर्गांन कडून प्रगती दलाल यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले असून मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून प्रगती दलाल यांचे कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.