Press "Enter" to skip to content

घाटकोपरमध्ये रक्षाबंधनानिमित्त हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांतर्फे पोलिसांना राखीचे बंधन

सिटी बेल | मुंबई |

रक्षाबंधनाचा सोहळा आहे देशभर साजरा होत आहे.बहीण-भावाच्या  पवित्रा नात्यांचा हा उत्सव. मोठ्या उत्साहात पार पडत आहे. रक्षाबंधन असो, वा अन्य कोणताही सण, पोलिसांना शहरातील शांतता, कायदा सुव्यस्था सांभाळण्यासाठी कामावर हजर राहावे लागते. त्यामुळे अनेकदा आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधनासारखा सण साजरा करता येत नाही. कोरोनाचे युद्ध अजूनही संपलेले नाही  या कोरोना युद्धात पोलिसांनी महत्वाची भूमिका निभावली असून आजही ही लढाई पोलिसांसारखे अनेक कोरोना योद्धा लढत आहे, याच सामाजिक बांधलिकेतून घाटकोपर येथिल झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

कोरोना वेळी बंदोबस्त जन आशीर्वाद यात्रा , मोहरम तसेच येणारा  गणेशउत्सव हा पोलिसांच्या कसोटीचा काळ ठरत आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील घाटकोपर पोलीस स्थानकातील पोलिसांना रक्षाबंधनानिमित्त खास हॉस्पिटलमध्ये आमंत्रित केले होते. झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या महिला कर्मचाऱ्यांनी पोलिसांना राख्या बांधल्या.

कोरोना काळात काम करणाऱ्या समस्त पोलीस बांधवांच्या शौर्य, त्याग, समर्पणाबद्दल रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी कृतज्ञ राहण्याची गरज असल्याचे मत झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे मार्केटिंग व बिजनेस हेड आशिष शर्मा यांनी व्यक्त केले.

यावेळी घाटकोपर पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनू दळवी, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण बोडके, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत ठाकूर, किरण गावडे व  विक्रम थोरात यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.