Press "Enter" to skip to content

कांजूरमार्ग मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावर्षी सुवर्णमहोत्सवी पदार्पण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान ठेवून साधेपणात व भाविकतेने गणेशोत्सव साजरा करणार – अध्यक्ष बाबा कदम

सिटी बेल | मुंबई | पंकजकुमार पाटील |

यावर्षी हिंदुस्थानने आपला अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा केला.मुंबईत मराठी माणसावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी मार्मिकचे प्रकाशन केले . या वर्षी हेच मार्मिक ६१ व्या वर्षात पदार्पण करत आहे . योगायोगाने कांजुरमार्ग (पुर्व) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे देखील यावेळचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. कांजुरमधील हिंदु -मराठी माणसाला एकत्रित करून गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप देण्याचे काम शिवसैनिकांनी गेल्या ५० वर्षापूर्वी केले. त्यामुळे मंडळाने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करण्याचा हा आनंदाचा क्षण आहे .

दुर्दैवाने गेल्या दीड वर्षातील कोरोनाचा काळ व प्रादुर्भाव आणि येणारी कोरोनाची कदाचित तिसरी लाट या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर या महामारीमुळे लोकांकडे असणारी साधनसामुग्री , नोकरी धंद्याचा प्रश्न व एकंदरीत याचा सर्वसामान्यांना होणारा त्रास या रोगराईतून मुक्त होत असताना सर्वसाधारण जो आमचा वर्गणीदार , देणगीदार , जाहिरातदार आहे यांना बरोबर घेऊन हा गणेशोत्सव साजरा करत असताना खऱ्या अर्थाने कुठल्याही परिस्थितीत वर्गणी -देणगी यासाठी कुणालाही दबावाखाली न आणता लोकांनी स्वखुशीने -स्वइच्छेने या सुवर्णी महोत्सवी वर्षांमध्ये आम्हाला सहकार्य करावे असे नम्रतेचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केले आहे .

आज सगळ्याच जनतेची परिस्थिती – आर्थिक परिस्थिती नाजूक आहे . असे असताना गणरायाचे स्वागत करून , दहा दिवसाचे आगमन, इतर सणासुदीतील गोष्टी पूर्ण करताना त्यामध्ये कुठल्याही अडचणी न आणता गणरायाची भक्तिभावे-भाविकतेने पूजा करायची आहे . ते करत असताना मनोरंजन कार्यक्रमांना फाटा व इतर कार्यक्रमांना बाजूला सारून श्री गणेशाचे दर्शन दहा दिवस गणेशभक्तांना होणार आहे. तेव्हा कांजुरमधील तमाम जनतेने याठिकाणी येऊन मंडळाच्या गणेशाचे मनोभावे दर्शन घेण्याची विनंती सुद्धा त्यांनी केले आहे.

यावर्षीची मंडळाची कार्यकारणी पुढीलप्रमाणे – बाबा कदम -अध्यक्ष , विजयभाई तोडणकर -कार्याध्यक्ष , अनंत पाताडे -उपाध्यक्ष , सुधाकर पेडणेकर -उपाध्यक्ष ,नंदकुमार ठाकूर -सरचिटणीस , राजेश शेट्ये व रविंद्र महाडीक -सहचिटणीस ,कमलाकर पवार -समन्वयक , प्रकाश शिंदे – खजिनदार , सुधीर सावंत – सह खजिनदार , चिटणीस -बाबा पराडकर , मनोहर शिंदे , वैभव मोरे , जयेश मगर , दीपक पाटील , दिलीप ब्रह्मदंडे , हरिश्चंद्र कांबळी , सुरेश घाग

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.