कलाकार ओंकार नलावडेचा शिवसेना कांजूर शाखेच्या वतीने सत्कार
सिटी बेल | कांजुरमार्ग | पंकजकुमार पाटील |
टोकियोमध्ये ऑलम्पिक स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी बहारदार कामगिरी केली. याच ऑलम्पिकवीरांची कामगिरी समोर ठेवून स्वातंत्र्य दिनी भांडुप-कांजुरमधील कलाकार ओंकार नलावडे याने आपल्या अनोख्या कलेतून त्यांना सलाम केलेला आहे.
सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा , रौप्य पदक विजेती मीराबाई चानू ,कास्य पदक विजेते बजरंग पुनिया आणि पी व्ही सिंधू यांचे अनोखे इल्युजन पोर्ट्रेट साकारले आहेत . यामध्ये साडेपाच फुटी कागदी पुठ्यांचे चौकोनी आकाराचे खांब तयार करून त्याद्वारे पुढच्या बाजूला दोन व मागच्या बाजूला दोन खेळाडूंचे पोर्ट्रेट साकारून एका बाजूने पाहिल्यास एक खेळाडू तर दुसऱ्या बाजूने दुसरा खेळाडू पाहायला मिळतो . ओंकारच्या याच अनोख्या कलेची दखल घेताना शिवसेना कांजूर शाखेच्या वतीने सरस्वती विद्यामंदिर या ठिकाणी भारतीय म्युनिसिपल कामगार सेना अध्यक्ष बाबा कदम यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना उपविभाग प्रमुख अनंत पाताडे , शाखाप्रमुख रविंद्र महाडिक , माजी शाखाप्रमुख तानाजी मोरे , विजय भाई तोडणकर , महिला संघटक सिद्धी जाधव,भारती शिंगटे , प्रकाश शिंदे ,विकास नांदिवडेकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment