तळीये दुर्घटनेत जे जे आणि के एम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आमदार भरतशेठ गोगावले यांनी घेतली भेट
सिटी बेल | अलिबाग |अमूलकुमार जैन |
उपचार घेत असलेले रुग्णांचे कोणाचा पाय कोणाचा हात कोणाची कंबर तसेच शरीरातील ईतर अवयव दरडी खाली अढकल्यामुळे निकामी झाले आहेत. दुर्घटनाग्रस्त तळीये गावातील रुग्णांना मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला. त्या मुळे गोगावले यांनी तात्काळ के ई एम आणि जे जे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना जाऊन धीर देत दोन्ही रुग्णालयाचे अधिष्ठाता( डीन ) यांच्याशी चर्चा केली आणि आपण रुग्णांकडे खासकरून लक्ष द्यावे असे सांगितले.

के ई एम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका मुलीला आपला एक पाय गमवावा लागला आहे. या वेळी के ई एम रुग्णालयाचे डॉ बांगर सर यांनी आमदार गोगावले यांना सांगितले की, मी स्वतः या मुलीकडे उपचार करण्यासाठी लक्ष ठेवून आहे.या मुलीला औषध उपचार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नसल्याचे बांगर सर यांनी सांगितले.

तसेच गोगावले यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकाना सांगितले की या रुग्णांच्या उपचारा करिता आपण कसलीही काळजी करू नका. यांना सर्वतोपरी उपचारासाठी लागणारी आर्थिक असो की आणखी कोणतीही मदत करण्यासाठी आम्ही आणि शासन देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.









Be First to Comment