ठेवीदारांना पाच लाखांची रक्कम देण्याबाबत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड सकारात्मक प्रयत्न करणार
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांची कोकण किसान मोर्चा चे संपर्क प्रमुख सुनील गोगटे यांनी दिल्ली येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. व पेण को ऑप बँकेसंदर्भात ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळालेच पाहिजेत, बँकेचे असेंट विकून पैसे द्यावेत किंवा राष्ट्रीयकृत बँकेत विलीनीकरण करावे अशी मागणी यावेळी त्यांनी भागवत यांच्याकडे केली आहे.
केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार बुडीत बँकेच्या ठेवीदारांना 5 लाख रुपये 90 दिवसाच्या आत द्यावे या नियमात पेण को ऑप बँकेच्या ठेवीदारांना पैसे दिले गेले पाहिजेत अशी मागणी गोगटे यांनी अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे केली. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकर यावर निर्णय करू असे आश्वासन भागवत कराड यांनी दिले आहे.
या मागणीचे निवेदन देताना सोबत तालुका सरचिटणीस राजेश भगत आणि अक्षय सर्वगोड उपस्थित होत. यामुळे ठेवीदारांच्या आशा पल्लवित झाल्या असून त्यांना दिलासा मिळाला आहे असे सुनील गोगटे यांनी सांगितले.








Be First to Comment