ग्रामीण भागात विकासाची गंगा न्यायची असेल तर सरपंच, ग्रामपंचायतीला बळ देण्याची नित्यंत आवश्यकता – जयंत पाटील
सिटी बेल | कळंबोली | प्रतिनिधी |
ग्रामीण भागाच्याा विकासाचा एकमेव मार्ग म्हणजे पंचायत राज ! ग्रामिण महाराष्ट्राला जर पुढे घेवून जायचं असेल तर सरपंच आणि ग्रामपंचायतीना बळ देण्याची आवश्यकता आहे यातूनच गावचा विकास होईल असे प्रतिपादन आखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले
पनवेल तालुका सरपंच मेळावा बेलवली पनवेल येथे आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आखिल भारतीय सरपंच परिषदेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अनिल ढवले यांनी सांगितले की केंद्राच्या 15 व्या वित्त आयोगाद्वारे ग्रामपंचायत खात्यात येणाऱ्या रक्कमेत राज्य सरकारने ढवळाढवळ करू नये तो फक्त ग्रामपंचायतीलाच अधिकारी असावा यात हस्तक्षेप होत असल्याने गावाच्या विकासात अडचणी येत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक केसेस प्रलंबित आहेत. निवडून आल्यानंतर वेगवेगळ्या कारणास्तव अनेक सरपंच, सदस्य यांचे सदस्यत्व बाद होत आहेत. निवडणूकीचे फार्म दाखल करतानाच काय ते निकष लावावेत. पंचायत राज निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरज आहे. 20 वर्षापासून गावरान, वनविभागाच्या जागेत वास्तव्य किंवा अतिक्रमण असल्यास ते नियमित करण्यात यावीत असे परखड मत जिल्हा संघटक नंदू भोपी यांनी आपले मनोगत मांडले. पनवेल तालुका सरपंच मेळाव्याला सचिन तांडेल पनवेल तालुका अध्यक्ष, डी बी म्हात्रे सरपंच वावंजा, समीर दुद्रेकर माजी सैनिक, नामदेव पाटील सरपंच चिखळे, सौ. कमळा तशेकर चिध्रण सरपंच. सौ. योगीनी म्हसकर, सोनाली माळी, रेश्मा माळी आदिसह मोठ्या संख्येने सरपंच सदस्य उपस्थित होते.








Be First to Comment