तळीये गावा सारखी दुर्घटना होण्याची दाट शक्यता : भरावासाठी डोंगर पोखरले प्रशासनाचे दुर्लक्ष ?
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
गेले काही दिवस पाउस पडत असल्यामुळे जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली.तर डोंगराच्या छायेखाली असलेली महाड येथिल असलेले तळीये गाव एका क्षणांत या मातीच्या ढिगा-या खाली गाडळे गेले.मात्र या माध्यमातून आपण काही शिकलो पाहिजे. खालापूर तालुक्यातील इसांबे गावाजवळ असलेली इसांबे आदिवासी यांच ठिकाणी डोंगर उत्खलन सुरु असल्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते.
आज ही या ठिकाणी चार घरांचे कुटुंब या ठिकाणी वास्तवे करीत आहेत. मात्र बाकीच्या वाडीतील घराचे स्थलांतर करण्यात आले असून त्यांना योग्य मोबदला मिळाला असल्यामुळे ते स्थलांतर झाल्यांचे या वाडीत वास्तव्य करीत असलेले कृष्णा पांडू पवार यांनी सांगितले. मात्र कोणत्या अतिशर्ती च्या आधारावर या आदिवासी बांधवाना स्थलांतरित करून धनिकांच्या मागणी नुसार आदिवासी बांधवाना हलविन्यात आले या बाबत ही उलटसुलट चर्चा सुरू आहे.

इसांबे वाडी येथे 70 घरांची वस्ती असून त्यांना योग्य मोबदला देवून त्यांना रुची सोया जवळ असलेल्या ठिकाणी जागा देण्यात आली त्या ठिकाणी त्यांनी घरे बांधली. मात्र या ठिकाणी चार घरांना मोबदला योग्य मिळत नसल्यामुळे ते घर सोडण्यास तयार होत नसल्यामुळे त्यातच ही जागा एम.आय.डी सी येणार असल्यामुळे खरेदि केली गेली असल्याचे समजते.मात्र या ठिकाणी डोंगर पोखरुण टाकल्यामुळे भविष्यात यांचे भूस्खलन होवून ही माती जवळपासच्या गावात किंवा शेती व्यवसायाला धोका निर्माण होवू शकतो.मात्र याकडे महसूल खात्यांनी अक्षम दुर्लक्ष केल्याचे दिसते तर या कडे कोणीही गांभीर्याने घेत नाही.मात्र एखाद्या वेळी दुर्घटना झाल्यावर वर काय पाबंदि लावणार का ?असा सवाल येथिल नागरिक व्यक्त करीत नाही.

इसांबे वाडी जवळ असलेल्या डोंगराळ भागात उत्खलन सुरु असल्यांचे दुरवरुन सुद्धा पहावयास मिळत आहे.यामुळे येणाऱ्या काही पावसाळ्यात माळीण किंवा तळीये गाव सारखी अवस्था या ठिकाणी असलेल्या गावांची होवू नये डोंगर पोखरणे थांबवणे अत्यंत महत्वाचे निर्सर्गाच्या सानिध्यात राहयांचे आणी त्यांच्या मुळात घाव घातल्यामुळे यामुळे त्यांचे प्रकोप होणे साहजिकच आहे.म्हणून आपण या पासून चांगला बोध घ्यावा की निर्सर्गाला जपू त्यांना उध्वस्त केल्यास तो आपला संसार उध्वस्त करुन टाकेल.








Be First to Comment