Press "Enter" to skip to content

राज्यपालांनी महाड तळिये येथील दरडग्रस्त भागाची केली पाहणी

पूरग्रस्त, दरडग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी पोहोचले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

सिटी बेल | महाड | अमूलकुमार जैन |

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेट देत आहेत. आज त्यांनी रायगड जिल्ह्यातल्या महाड तळिये येथील दरड ग्रस्त भागाची पाहणी केली.


” ही झालेली दुर्घटना अदभुत घटना असून संपूर्ण गाव नष्ट होणे ही महाराष्ट्रातील यावेळी पहिली किंवा कमीत कमी घटनांपैकी एक आहे. ही झालेली घटना आहे. या घटनेमध्ये सर्व परिवार मृत पावले आहेत यामुळे आम्ही सर्व दुःखी आहोत. स्वतः पंतप्रधान दुःखी आहेत. मुख्यमंत्री यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आहे. जे झाले आहे त्यासाठी काहीच करणे कठीण असले तरी मी प्रयत्न करेन व केंद्र सरकार, राज्य सरकार मार्फत वाचलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे व जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न दोन्ही सरकार एकत्र येत काम करतील.

याठिकाणी मृत झालेल्या व्यक्तींना मी मनापासून श्रध्दांजली अर्पण करत असून देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
तुम्ही सर्वांनी सकारात्मक रित्या एकत्र येत काम केल्यास लवकरात लवकर उपाय करण्यासाठी मदत मिळेल.” असे यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार भरत गोगावले,आमदार आशीष शेलार, जिल्हाधिकारी निधी चौधरी व इतर अधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.