अखेर…नगरसेवक रविंद्र भगत यांचे मालमत्ता जाचक करा विरोधात बेमुदत उपोषण 4 दिवसानंतर मागे
सिटी बेल | कळंबोली | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेने नागरिकांवर लादलेल्या जाचक मालमत्ता कराला कडाडून विरोध करत नगरसेवक रविंद्र भगत यानी ( दि. १९ ) पासून बेमुदत उपोषणाचे शस्त्र उगारले होते. यावेळी त्यांनी कळंबोली विकासा बाबतही मागण्या केल्या होत्या. अखेर आज नगरसेवक रविंद्र भगत यांच्या पुढे महानगरपालिकेला नमते घ्यावे लागले. आज 4 थ्या दिवशी सायंकाळी त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना पनवेल महापालिकेेचे उपायुक्त विठ्ठल डाके यांनी रस पाजून त्यांचे बेमुदत उपोषण संपविण्यात आले.
अन्य महानगरपालिकेच्या तुलनेत पनवेल महानगरपालिकेने लावलेला मालमत्ता कर हा वाजवी असून तो नागरिकांवर अन्याय करणारा आहे तेव्हा नियमानुसार क्षेत्र सभा लावून त्याना विश्वासात घेवून लावण्यात यावा. चार वर्षाच्या बाळाची तुलना ३० वर्षाच्या तरुणासी ( नवी मुंबई महापालिका , ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महापालिका ) करताना सत्ताधा-यानी येथील जनतेची कोणतीही तमा बालगळी नाही. जनता करा विरोधात आक्रोश करत असताना आम्ही विशेष महासभा लावण्याची विनंती केली आहे. ती सभा लावली जात नाही एवढे सत्ताधारी मस्तावाल बनले आहेत. जनता कोरोनाच्या महामारीत कसे जगते हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. असा वैश्विक संकटात पालिकेने लावलेला जाचक कर रद्द करण्यात यावा. ४ वर्षात पालिका प्रशासनाकडून सिडको विकसित शहरात कोणतीही विकास कामे करण्यात आलेली नाहीत मग मालमत्ता कर येथील जनतेने का भरावा असा सवाल नगरसेवक रविंद्र भगत यांनी केला.

गेल्या चार वर्षापासून कळंबोली व परिसरातील कामा विषयी पाठपुरावा करत असताना फक्त विरोध म्हणून कामे केली जात नाहीत असा गंभीर आरोप रविंद्र भगत यांनी केला. कळंबोली सेक्टर १ मधील नाला बंद करण्यात यावा, कळंबोली गावातील नादुुस्त झालेली पाण्याची टाकी पाडण्यात आली आहे ती बांधण्यात यावी. बेलदारवाडी येथील नागरिक पाण्याच्या समस्येने हैराण आहेत तेथे पाण्याची टाकी बांधण्यात यावी, कळंबोली आदिवासीवाडी येथे स्टोरेज पाण्याची टाकी बांधण्यात यावी, कळंबोली आदिवासी बांधवांसाठी समाजमंदिर उभारण्यात यावे, कळंबोली स्मशानभूमीत विद्युत पाेल टाकण्यात यावेत, कळंबोली बौद्धवाडी येथेे बौद्धविहार व समाजमंदिर उभारण्यात यावे, लोक वर्गणीतून बांधण्यात आलेले काळभैरव सभा मंडप गावक-याकडे हस्तांतर करण्यात यावे अशा अनेक महत्वाच्या मागण्या करत संततधार पावसात नगरसेवक रविंद्र भगत यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. आज चौथ्या दिवशी पालिका प्रशासनाना रविंद्र भगत यांच्या पुढे गुडघे टेकावे लागले. त्यांच्या सर्व मागण्या लेखी निवेदनाने मान्य करण्यात आल्या. यावेळी महानगरपालिकेचे यांच्या हातून त्यांना फळरस पाजून त्यांचे बेमुदत उपोषण संपविण्यात आले.
यावेळी आमदार बाळाराम पाटील, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक गोपाळ भगत, नगरसेवक गणेश कडू, नगरसेवक शंकर म्हात्रे, नगरसेविका कमळ कदम, युवा नेते विजय पाटील, विजय भोईर, कमळाकर जले, आदिसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.








Be First to Comment