Press "Enter" to skip to content

अभिजीत पाटील मेड इन इंडिया आयकॉन 2021 चे मानकरी

राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार

सिटी बेल | मुंबई |

मेड इन इंडिया आयकॉन 2021 हा नामांकित पुरस्कार भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य अभिजित पाटील यांना मुंबईतील राजभवन येथे प्रदान करण्यात आला.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यावेळी पनवेलचे अभिजीत पाटील यांना सामाजिक आणि पर्यावरणासाठीच्या केलेल्या कामाची दखल घेत त्यांना मेड इन इंडिया आयकॉन 2021 महाराष्ट्र सन्मान प्रदान करण्यात आला. अभिजीत पाटील यांच्यासह गायक उदित नारायण, कुमार सानू , मराठी कलाकार स्वप्निल जोशी, भरत जाधव, प्रशांत दामले, उद्योगपती सौ लोढा , पोलिस अधिकारी यांनासुद्धा सन्मानित करण्यात आले.

मला भरभरून यशाची नेहमी भीती वाटायची. त्यानं माणसं तुटतात, आपण एकटे पडतो असं वाटायचं. आपल्याला नकोच ते यशबिश! पण पुरस्कार मिळाल्यापासून माझ्यावर मनापासून केलेल्या प्रेमाचा वर्षांव बघत आहे. भीती कमी होते आहे. यश इतकं काही धोक्याचं नसतं तर.. त्याला इतकं घाबरायचं कारण नाही.. त्याच्याकडे नीट बघतो आहे . शांतपणे. संपूर्णपणे. त्याला नि:संग स्वीकारतोय. बरेच पुरस्कार मिळाले मिळत आहेत पण यामुळे डोक्यात अजिबात हवा जाणार नाही याची शास्वती देतो. स्वतः ला अर्थवटच्या भूमिकेत पाहतो कारण परिपूर्ण होऊन संपण्याची माझी इच्छाशक्ती नाही. आणि इथेच थांबणार नाही यशाचे शिखर गाठायचे आहे.

अभिजीत पाटील

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.