शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
सिटी बेल | कळंबोली | विकास पाटील |
आज पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील Covide-19 कोरोना विषाणूमुळे ज्या मुलांने आई वडील गमावले आहेत, असा मुलाना उभारी देण्यासाठी मुलांच्या शिक्षणाकरिता महापालिके मार्फत शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदनाद्वारे केली.
कोरोना विषाणूमुळे ज्या मुलांचे आई-वडील त्यांनी गमावले आहेत. अश्या मुलांच्या १ ली ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणा करिता रुपये ७,०००/- शिष्यवृती स्वरूपात देण्यात यावी. कारण मुळातच कोरोनामुळे गेली २ वर्षात जनतेची आर्थिक परिस्थिति खूप बिकट झाली आहे. त्यातच ज्या घरातील Covide-19 कोरोना विषाणूमुळे ज्या मुलांनी त्यांचे आईवडील गमावले आहेत, अशा मुलांसाठी ही योजना चालू कराण्यात यावी.
ही योजना त्या मुलांच्या आयुष्याला उभारी देणारी असून त्यांना घडविणारी आहे. अशा प्रकारची योजना नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या चालू असून, त्याची दखल घेत पनवेल महानगर पालिका क्षेत्रात ही योजना चालू करण्यात यावी अशी विनंती जिल्हा प्रमुख शिरिष घरत यांनी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे यावेळी महानगर प्रमुख रामदास शेवाळे, शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर तसेच उपमहानगर प्रमुख दिपक घरत अदि मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment