Press "Enter" to skip to content

मानखुर्द येथे अबोली महिला रिक्षा संघटनेच्या शाखेची स्थापना

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

पनवेल परिसरात कार्यरत असणाऱ्या अबोली महिला रिक्षा संघटनेची शाखा मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे स्थापन झाली आहे. मानखुर्द येथे पंधरा सदस्य असून यामध्ये आणखी वाढ होणार आहे.

मानखुर्द येथील शाखे मध्ये आणखी महिलांची संख्या वाढत आसून येथील रिक्षा चालक महिलांना भेडसावणाऱ्या समस्या सोडीवण्यासाठी मानखुर्द विभागाच्या अध्यक्ष पदी अनिता राणे तर उपाध्येक्ष पदी मनिषा गवस यांची नियुक्ती करण्यात आली तसेच सर्व रिक्षाचालक महिलांनी रितसर सभासद फॉम् भरून संघटनेत सहभागी झाल्या यापुर्वी पनवेल, कळंबोली,कर्जत, खोपोली,कोपरखेरणे, कल्याण, अंबरनाथ,बदलापूर, डोबिवली, मानपाडा,नेरुळ, घणसोली, रबाले,नंतर आता पुन्हा मानखुर्द येथे शाखेची स्थापना करण्यात आली आहे.

या वेळी उपस्थित अबोली महिला रिक्षा संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष संतोष भगत होते तर रबाले ,घणसोली विभागीय आविता निबरे, नेरुळ विभागीय अंजना शिंदे तसेच मानखुर्द येथील रिक्षा चालक महिला उपस्तीत होत्या. तर संघटने तर्फे महिलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबिवले जातात.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.