हिंदूंवर अत्याचार करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे उदात्तीकरण हिंदु समाज सहन करणार नाही ! – हिंदु जनजागृती समितीचा इशारा
सिटी बेल | मुंबई |
गोवंडी येथील ‘एम/पूर्व’ विभागातील प्रभाग क्र. 136 मधील साहीनाका डम्पिंग रोड येथील उद्यानास क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव देण्याचा घाट समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी घातला आहे; मात्र हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे उदात्तीकरण हिंदु समाज कदापी सहन करणार नाही. त्यामुळे सदर उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देऊ नये, अशी आग्रही मागणी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांनी मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर आणि बाजार व उद्यान समितीचे उपाध्यक्ष तुकाराम पाटील यांच्याकडे केली आहे.
या विषयीचे निवेदन त्यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले आहे. यावर “टिपू सुलतान याचे मुंबईसाठी योगदान काय ? त्याचे नाव इथे कशासाठी ? याविषयी प्रशासकीय नियमांची पडताळणी करून मी लक्ष घालते”, असे आश्वासन महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी या वेळी दिले.
नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी बाजार व उद्यान समितीला पत्र लिहून उद्यानाला टिपू सुलतान नाव देण्याची मागणी केली आहे. दुर्दैवाने या मागणीला महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत टिपू सुलतानचे नाव देण्याची शिफारस बाजार व उद्यान समितीकडे केली आहे.
15 जुलै 2021 या दिवशी होणार्या बाजार व उद्यान समितीच्या मासिक बैठकीत हा विषय संमत होण्यासाठी येणार असल्याचे समजले आहे. त्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सदर मागणी महापौरांसह मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त आणि पालिका प्रशासन यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मुंबईतील विविध स्थळांना विविध धर्मातील महनीय व्यक्तींची नावे आहेत. त्याला आम्ही कधीही आक्षेप घेतलेला नाही; मात्र ज्याने दक्षिण भारतातील हिंदूंची 1 हजार मंदिरे पाडली, लाखो हिंदू महिलांवर अत्याचार केले, लाखो हिंदूंच्या हत्या केल्या, तलवारीच्या बळावर लाखो हिंदूंचे धर्मांतर केले अशा क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव उद्यानाला देणे हे हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रकार आहे. हे उदात्तीकरण हिंदू समाज कदापी सहन करणार नाही. सर्व धर्मांना समान वागणूक देऊन आदर्श निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान कुठे ? हा फरक महानगरपालिका प्रशासनाला करता यायला पाहिजे. आज क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव उद्यानाला दिले, तरउद्याऔरंगजेब, बाबर, खिलजी, महंमद गजनी, महंमद घौरी, तैमूरलंग, तुघलक आदी क्रूर मोगलांची नावे देण्याची मागणी पुढे येऊ शकते. त्यामुळे हे पाप महानगरपालिकेने आपल्या माथी घेऊ नये.
मुंबईचा एकोपा आणि सर्वधर्मसमभाव अबाधित राहण्यासाठी सदर उद्यानाला अन्य राष्ट्रपुरुषाचे नाव द्यावे,अन्यथा हिंदू समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणीही त्यात देण्यात आली आहे.असेडॉ. उदय धुरी,प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.








Be First to Comment