Press "Enter" to skip to content

ई पाँज मशिनवर थंबमुळे प्रशासन किती दुकानदारांचे घेणार बळी !

रास्त धान्य दुकान व किरकोळ राँकेल विक्रते यांच्या मागण्याचा सहानुभूतीपुर्वक विचार करण्याची मागणी




सिटी बेल | कळंबोली | विकास पाटील |


रेशनकार्ड धारकांचे ई पॉज मशीनवर बायोमेट्रीक थंब अंगठा घेणे काही काळावधीसाठी स्थागित करावे जेणे करून सर्व सामान्य गरीव कार्डधारकांना व दुकानदारांना कोरोना महामारीचाच्या साथीला सामोरे जावे लागणार  नाही महाराष्ट्र राज्यात सध्या डेल्टा व डेल्टा प्लस कोरोनाच्या नवीन विषाणूचे रूग्ण आढलत असल्याने कडक निर्बंधांची अंमलबजावणी करताना रास्त धान्य दुकानदारांनाही संरक्षण देण्यात यावे, त्यांचे जमा असलेले कमिशन अदा करण्यात यावे. रास्त धान्य दुकानदाराना वेळेवर वितरण करण्यात यावे.  दुकानदाराना कारण नसताना मानसिक त्रास देण्यात येवू नये.  या मागण्यांचा सहानुभूती पुर्वक विचार करण्यात यावी अशी मागणी रास्त धान्य दूकानदारांच्या वतीने उपायुक्त कोकण भवन यांच्याकडे लेखी निवेदनाने करण्यात आली आहे.  



पनवेल तालुक्यातील धान्य व रॉकेल दुकानदारांची बैठक कोरोना महामारी संदर्भातील नियम व अटीचे पालन करून तालुक्यातील दुकानदार व पदाधिका-याच्या उपस्थितीत  काश्यप हॉल पनवेल येथे घेण्यात आली होती.

या बैठकीत कोरोना महामारीची रूग्णसंख्या कमी झालेली वाटत असली तरी कोरोना साथ पुर्णपणे अटोक्यात आलेली नाही तेव्हा कोरोनाचा धोका टाळण्यासाठी ई पाँज मशिनवर थंब घेणे काही कालावधीसाठी बंद करण्यात यावेत. जनतेच्या मनात तिस-या लाटेची भिती कायम आहे ती महाराष्ट्र शासनाच्या अनेक बावीवरून दिसून येत आहे.त्यामुळे शासनाने तळागाळातील गरीब गरजू लोकांना माहे नोव्हेंबर २०२१ पर्यंत मोफत धान्य देण्याची प्रस्तावित योजना गोरगरीब जनतेला दिलासा देणारी आहे. पण कोरोना महामारीत  कोरोना रोगाचे उच्चाटन होईपर्यंत शासकीय नॉमिनी मार्फत धान्याचे वितरण करण्याचे आदेश व्हावेत.

महाराष्ट्र राज्यात सध्या डेल्टा व डेल्टा प्लस कोरोनाच्या नवीन विषाणूचे रूग्ण आढलत आहेत. शासकीय ई पॉज मशीनमधील तांत्रिक बायोमेट्रीक आधार सिडीगचा घोळ , पावसाळयात वीज व नेटवर्क नसल्याने ई पॉज मशीन वारंवार बंद पडत असल्यामुळे धान्य वाटपात अनेक अडचणी येत आहेत . तासनतास उभे राहून गर्दी करूनही धान्य मिळत नसल्याने ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी ग्राहकात तीव्र नाराजी आहे. तर दुकानदारही त्रस्त आहेत. याचाही गांभीर्याने विचार करण्यात यावा. 


 

शासनाच्या नियमानुसार धान्यचे वितरण सर्व लाभार्थी पर्यत होत आहे. पण सबंधित कार्यालयाकडून गरजेनुसार धान्य पुरवठा होत नसल्याने कार्डधारकांमध्ये अतिशय नाराजी आहे  वेळोवेळी याबाबत तक्रारी केल्या आहेत. तो कसा होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. शासनाकडील उपलब्ध आधारलिंक बायोमेट्रीक रेशनकार्ड धारकांना शासनाने नियमित केलेला धान्याचा कोटा दुकानदारांना उपलब्ध करून दयावा जेणे करून रेशनकार्ड धारक व दुकानदार यांच्यामध्ये प्रेमाचे व जिव्हाळयाचे संबंध राहातील सन २०२० मार्च पासून कोरोनाच्या महाभयंकर महामारीत शासकीय नियमानुसार ऑनलाईन व ऑफलाईन धान्याचा वाटप / वितरण रास्त भाव धान्य दुकानदारांनी जिवावर उदार होवून धान्य वितरणाचे काम केले आहे त्या काळात काही दुकानदारांना मृत्यूने कवटाळले.परंतु रास्त भाव धान्य दुकानदारांना विमा कवच नसल्यामुळे मृत्यू झालेल्या दुकानदारांच्या कुटूंबाचे अक्षरश : कुत्रे हाल खात नाही


 

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे २०२० रोजीचे प्रलंबित  कमिशन एकरकमी वर्ग केलेली आहे ते त्वरित देण्यात यावे.  रास्त भाव धान्य दुकानदार व रॉकेल दुकानदारांनी नुतनीकरण व प्राधिकार पत्राची फी चलनाद्वारे शासन जमा केल्यानंतर परवाना नुतनीकरण व प्राधिकारपत्र उपलब्द करून देण्यांची जबाबदारी संबंधित अधिका यांवर अवलंवून असून सुध्दा अनेक प्रकरणे तालुका व जिल्हा पुरवठा कार्यालयात प्रलंबित आहेत. अनेक वर्षापासून प्रलंबित प्रकरणामुळे दुकानदारांना नाहक दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे संबंधित अधिका-यांवर शासकीय नियमानुसार जबाबदारी व शासकीय कर्तव्य निश्चित होणे आवश्यक आहे पण तसे होत नसल्याने दुकानदारानाच जबाबदार धरले जाते.  


रॉकेल बाबत हमीपत्र घेवून रॉकेल पुरवठा करणे बंधनकारक असून सुध्दा शासनाच्या परिपत्रकाचा सोयीचा अर्थ लावून पनवेल पुरवठा , तहसिलदार अथवा रॉकेल दुकानदार यांची मागणी अहवाल न मागवता तडकाफडकी बंद करणे ही बाब गंभीर स्वरूपाची असून दुकानदार व लाभार्थी कार्डधारकांवर अन्याय करणारी आहे. पनवेल महानगरपालिकेत अनेक नागरी प्रकल्प उभारले जात असून गरीब कामगार वर्गाची रॉकेल विना  उपसमार होत आहे त्यामुळे गरीब जनतेचे कुत्र्या सारखे हाल होत आहेत तेव्हा  २०१८ पासून खंडीत केलेला आवश्यक व गरजेचे रॉकेल पुरवठा युध्दपातळीवर पूर्ववत करण्यात यावा. त्याच प्रमाणे धान्याचे वितरण महिन्याच्या दुस-़या आठवड्यात करण्यात यावे. परिणामी संपूर्ण धान्याचे वाटप करणे शक्य होईल.  


सध्या शासनाच्या नियमानुसार नवीन बारदान खरेदी करणे युध्दपातळीवर सुरू आहे. जुने बारदान खरेदी करून नवीन बारदानाचे मु्ल्य लावले जात असून
यामध्ये मोठा भष्टाचार होत आहे. याची चौकशी करण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे अनोळखी व्यक्ति पोलिसांच्या मदतीने दुकानदारांना ब्लॅकमेल करत दुकानदाराला मानसिक त्रास देण्यांचा प्रयत्न होत आहे तेव्हा या मागण्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार होवून त्या मागण्या मान्य करण्यात याव्यात अशी मागणी दुकानदाराच्या वतीने रास्त धान्य दुकान व किरकोळ  राँकेल विक्रेता वेल्फेअर असोसिएशनचे   अध्यक्ष भरत पाटील यांनी निवेदनाने उपायुक्त कोकण भुवन ( पुरवठा) यांच्याकडे केली आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.