Press "Enter" to skip to content

लोकशाहीचा चौथा स्तंभ रेल्वे प्रवासापासून वंचित का ?

पत्रकारांना रेल्वे प्रवासाची मुभा द्या : रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजित पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सिटी बेल | पनवेल |

मध्य रेल्वेच्या माध्यमातून कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेप्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली असली तरी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना मात्र रेल्वेप्रवास मुभा मिळत नाही, त्यामुळे पत्रकारांना मुभा देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे पनवेल तालुका कार्याध्यक्ष तथा भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने सल्लागार सदस्य अभिजित पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यातील अधिस्वीकृती धारक पत्रकारांना अनेक सवलती दिल्या आहेत, मात्र अत्यावश्यक सेवेत चालविण्यात येणाऱ्या मुंबई तसेच मुंबई उपनगर, नवी मुंबई येथील पत्रकारांना नेहमीच ये – जा करावी लागत असते. त्यामुळे या पत्रकारांना अत्यावश्यक सेवेत रेल्वेप्रवास मुभा देण्यात यावी आणि जे पत्रकार अधिस्वीकृती धारक नाहीत मात्र वृत्तपत्रांमधून आपली चोख कामगिरी बजावत आहेत अशा पत्रकारांनी लसीकरणाच्या दोन्ही डोसचे सर्टिफिकेट सोबत ठवले तर त्या पत्रकारांना रेल्वे प्रवासात अनुमती द्यावी अशी मागणी पनवेल तालुका काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाचे सल्लागार सदस्य अभिजित पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

गेल्या महिन्यातच माझी भारत सरकारच्या रेल्वे प्रशासनाच्या सल्लागार सदस्यपदी नेमणूक झाली. येत्या २ वर्षांच्या या कालावधीत माझ्यासारख्या अनेक मंडळींना रेल्वे प्रवासात भोगाव्या लागणाऱ्या यातना कमी करण्याच्या दृष्टीने मला काम करायचे आहे. रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या अडचणी असतील अथवा रेल्वे विभागात काम करणाऱ्या ठेकेदार तसेच कर्मचाऱ्यांच्या अडचणी असतील, त्या संबंधित प्रशासनाच्या समोर आणून सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्या अडचणी संपुष्टात आणण्यासाठी काम करायचे आहे. माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकशाहीच्या चौथा स्थंभाची अडचण माझ्यासमोर आली, आणि ती तत्काळ निवेदनाद्वारे आपण राज्य सरकारच्या समोर आणली आहे. प्रश्न अनेक आहेत, मात्र त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सर्वसामान्य नागरिक, प्रवाशी यांचे अनेक गंभीर प्रश्न माझ्याकडे आले आहेत. आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने माझे काम आता खऱ्या अर्थाने सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या २ वर्षात मी नागरिकांसह प्रवाशांना भेडसावणाऱ्या अधिकाधिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करीत राहणार आहे.

– अभिजित पां. पाटील, सल्लागार सदस्य, मध्य रेल्वे, भारत सरकार

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.