सिटी बेल | मुंबई |
विक्रोळी ते मुलुंड विभागात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांना पावसाचा सामना करण्यासठी घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या वतीने २०० रेनकोटचे वाटप करण्यात आले .

घाटकोपर येथील पूर्व द्रुतगती मार्ग परिक्षेत्र वाहतूक विभागाच्या कार्यालयात हे वाटप करण्यात आले. पाऊसाचा जोर आता नसला तरी येत्या काळामध्ये पाऊस जोरदार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच पुढील दोन महिने अनेक धार्मिक उत्सव साजरे केले जाणार आहेत त्यामुळे भर पावसामध्ये मुंबईतीळ वाहतूक सुरळीत राहण्यासाठी झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलतर्फे वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्यात आले आहे.
रेनकोट वितरणाच्या कार्यक्रमाच्या वेळी साहाय्य्क पोलीस आयुक्त श्री सुरेश शिंदे ,प्रभारी पोलीस निरीक्षक श्री हुसेन जतकर , झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे बिजिनेस डेव्हलपमेंट प्रमुख श्री आशिष शर्मा , सिनियर मॅनेजर – बिजिनेस डेव्हलपमेंट श्री पुर्वीत मेहता तसेच वाहतूक विभागात काम करणारे वाहतूक पोलीस उपस्थित होते. वाहतूक पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल श्री सुरेश शिंदे यांनी झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे आभार मानले.
यावेळी बोलताना झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे आशिष शर्मा म्हणाले, ” गेली दीड वर्ष कोरोनाचा कालावधी हा पोलिसांसाठी फारच आव्हानात्मक राहिला आहे तसेच समाजहित जपण्यासाठी पोलिसांची महत्वाची भूमिका असते. ऊन, वारा पाऊस याची फिकीर न करता वाहतूक पोलीस हे आपले कार्य बजावत असतात व या वाहतूक पोलिसांच्या सेवेचा सन्मान करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबविला आहे तसेच यापुढेही वाहतूक पोलिसांसोबत मोफत डोळे तपासणी , आरोग्य तपासणी व आरोग्यविषयक मार्गदर्शक कार्यशाळा आयोजित करणार आहोत.”








Be First to Comment