मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर द्यावे म्हणजे आश्चर्यंच !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही आमचे विषयच घेणार नाही का ? पत्रकारांचा सवाल
सिटी बेल | मुंबई |
जिथं लोकशाहीच धोक्यात आहे, लोकप्रतिनिधींनाच येथे धमक्या दिल्या जात असतील तर, तुमच सोडा ! तिथं पत्रकारांच काय घेऊन बसलात ? असं वक्तव्य मुख्यमंत्री यांनी जरी केले असले तरी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची निर्णय घेण्याची क्षमता आहे. अधिवेशनात विधानसभेत घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी अशी नाराजी व्यक्त केली असली तरी, महाराष्ट्र राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री, आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे कायदे करण्याची तसेच बदलण्याचे अधिकार आहेत.
त्यामुळे राज्याचे पालकत्व असलेले मुख्यमंत्री यांनी एनयूजेच्या अध्यक्षा शीतल करदेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला आता जरी समाधानकारक उत्तर देऊ शकले नसले तरी, नक्कीच यावर निर्णय घेतील असा विश्वास आहे. पत्रकारांचे रजिस्ट्रेशन करावे, त्यांना माध्यमकर्मी म्हणून अधिकार व आर्थिक सामाजिक संरक्षण मिळावे,महामंडळ व्हावे, कृषी कायद्याप्रमाणेच कामगार कायद्यातील पत्रकार कायद्यात सुधारणा,व राज्याचे माध्यमकर्मीबाबत हितकारक धोरण व्हावे या मागण्या ऩँशनल युनियन जर्नालिस्ट्स महाराष्ट्रच्यावतीने केलेल्या मागण्यांवर, मा मुख्यमंत्री, मा उपमुख्यमंत्री लवकरच यावर निर्णय देतील, असा विश्वास हा व्हिडीेओ व्हायरल झाल्यानतंर एनयुजेएमच्या शीतल करदेकर यांनी व्यक्त केला.








Be First to Comment