सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
सावळे रसायनी येथील हभप हसूराम भागाजी माळी यांचे वृद्धापकाळाने देहावसान झाले .मृत्युसमयी ते 90 वर्षा चे होते.हभप हसूराम माळी हे या भागातील हॉटेल उद्योजक म्हणून त्यांची ओळख होती. माजी सभापती गजानन माळी, अनंता माळी व प्रमोद माळी माजी उपसरपंच सावळे हे तिघे हसूराम माळी यांचे पुत्र.
हभप हसूराम माळी यांनी गुळसुंदे रसायनी परिसरातील वारकरी संप्रदायासाठी काम केले.गुलसुंदे येथील वारकरी सप्ताहाचे बरेच वर्ष अध्यक्ष, खजिनदार तसेच आळंदी येथील धर्मशाळेसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी मंदिर,धर्मशाळा,अन्नदानासाठी देणगी दिल्या आहेत.ते वैकुंठ वासी ह भ प बाळाराम महाराज कांबेकर यांचे शिष्य होते.
वृद्धापकाळाने हभप हसूराम माली यांचे निधन झाल्याने सावले गावावर शोककळा पसरली आहे.








Be First to Comment