सिटी बेल | उलवे | मनोज पाटील |
मानवाला निसर्गाविषयी प्रेम व आदर निर्माण व्हावा याकरिता १९५० पासुन भारतात १ जुलै ते ७ जुलै हा सप्ताह वन महोत्सव म्हणुन साजरा करण्यात येत असल्याने उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने उलवे सेक्टर १७ रेल्वेलाईन लगतच्या मोकळ्या परिसरात वड, उंबर, पिंपल, आंबा, कडूलिंब, जांभुळ, फणस, बेल, आणि काजू अशा विविध प्रकारचे जीवनदायी देशी वृक्षांचे रोपण करुन वन महोत्सव साजरा करण्यात आले.
पावसाळ्यात वृक्ष लागवडीवर अधिक भर देण्याच्या उद्दिष्टाने आणि उलवे शहरातील पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सद्यस्थितीला वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याने त्याचे गांभिर्य लक्षात घेवुन निसर्गसेवेसाठी संस्थेच्या माध्यमातुन वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. उलवे सेक्टर १७ पासुन ते पुढे रेल्वे लाईन च्या दोन्ही बाजुस मोकळ्या जागेत आणखी असेच देशी वृक्षलागवडीचे कार्य संस्थेच्या वतीने हाती घेणार असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी वृक्षमित्र धनंजय तांबे, माजी सैनिक निलेश म्हात्रे, भगिरथ कोळी, हरिश्चंद्र तांडेल, मनोहर सर , नितीन वाघ, वसंत वालकुंडे वटवृक्ष सामाजिक संस्थेचे गणेश मढवी, सचिन पाटील आदी वृक्षप्रेमी उपस्थित होते.








Be First to Comment