अधिकारी ठेकेदाराची मिलीभगत सिडकोच्या पैसावर डल्ला
सिटी बेल | कळंबोली | प्रतिनिधी |
गेली अनेक वर्षापा पडून असलेला कळंबोली सेक्टर ८ कारमेल शाळेला लागून असलेल्या नाल्याच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत असून संरक्षण भित पावसाळ्यात तग धरेल का ? असे सवाल नागरिक करत आहेत. तेव्हहा या नाल्याची गुण नियंत्रकांकडून तपासणी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खातं अशी अवस्था अधिका-यानी सिडको प्राधिकरणाची केली आहे. वरपासून खाल पर्यत कमिशनच्या मागे लागल्याने दर्जेदार कामे कुठे होणार आहेत. गेल्या वर्षीपासून 10 कोटीच्यावर कळंबोली शहरात कामे करण्यात आली या करण्यात आलेल्या कामात कोणतेही निकष लावले गेले नसल्याने सर्व कामे निकृष्ठ दर्जाची करण्यात आली आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावरील तुटले असून अपघाताचे कारण ठरून रहिवासींच्या मृत्युचे कारण ठरत आहेत. गेली अनेक वर्षापासून सेक्टर ८ कारमेल शाळेला लागून असलेल्या नाल्याला संरक्षण भिंत नसल्याने पावसाळ्यात नाल्याचे पुर्ण पाणी रस्तावर व सोसायटीनध्ये शिरत आहे. त्याच नाल्याच्या पाण्याच्या दुर्गंधीने परिसरातील नागरिक हैराण आहेत. या बाबत अनेक वर्तमान पत्रातून बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
या नाल्याला संरक्षण भिंत बांधण्याची काम दोन दिवसांपासून सुरू आहे पण या बांधकामासाठी वापरलेला माल हा निकृष्ठ दर्जाचा असून वाळूच्या जागेवर रस्त्यावरील माती वारल्याचे या कामाची तपासणी केल्याचे दिसून येते तेव्हा हे काम तात्रिंक मान्यतेनुसार झाले नसून संरक्षण भिंत पावसाळा तरी काढेल का? असा सवाल नागरिकांनी करून याची संरक्षण भितींची गुण नियंत्रकांकडून तपासणी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.








Be First to Comment