अंमली पदार्थांबाबत पत्रक वाटून प्रबोधन
सिटी बेल | मुंबई | पंकजकुमार पाटील |
शनिवार दि. २६ जून २०२१ रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन निमित्त अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा यांच्या वतीने पोलीस दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा पोलीस उप आयुक्त श्री दत्ताजी नलावडे, पोलीस सहा. आयुक्त श्री राजेंद्र चिखले तसेच आझाद मैदान, वरळी, वांद्रे, कांदिवली, घाटकोपर या सर्व युनिटचे पदाधिकारी यांचे सोबत मिरॅकल फाऊंडेशन मुंबई व्यसनमुक्ती केंद्राचे समन्वयक रमेश सांगळे उपस्थित होते.
आयोजकांनी या रॅलीचे नियोजन अतिशय अभ्यासपूर्ण केल्यामुळे ती यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. विशेषतः ज्या विभागातून या रॅलीचे मार्गक्रमण झाले. त्या विभागांमधून अंमली पदार्थांबाबत प्रबोधन होणे गरजेचे होते. त्यासाठी यावेळी मराठी, हिंदी, उर्दू भाषेमधील पत्रकं वाटण्यात आली. त्यामुळे आजच्या दिनाचे महत्त्व व अंमली पदार्थांबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदतच झाली. या सर्व कार्यक्रमाचे श्रेय अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा मा. पोलीस उप आयुक्त श्री दत्ताजी नलावडे साहेब व त्यांचे सहकारी यांना द्यावे लागेल . तसेच आझाद मैदान, वरळी, वांद्रे, कांदिवली, घाटकोपर या सर्व युनिट च्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही रॅली ली यशस्वी होण्यास मदत झाली.










Be First to Comment