Press "Enter" to skip to content

विचारधारा

विचारधारा

विविध कला व मनाचे आरोग्य

नैसर्गिकरित्या अंगी एखादी कला असणे ही दैवी देणगी म्हटले जाते. पण एखादी कला आत्मसात करणे किंवा शिकणे म्हणजे आपली चिकाटी, जिद्द, प्रयत्न असतात. आता या चौसष्ठ प्रकारच्या कला म्हणजे चौसष्ठ योगिनी-देवता आहेत. म्हणून भारतीय संस्कृतीत या कला पूजनीय मानल्या जातात.
कला सादर करणे मग ती अभिनयकला, संगीतकला वा नृत्यकला वगैरे असो; त्यात मनातील भावनांचे प्रतिबिंब उतरवून ते श्रोते-प्रेक्षक यांपर्यंत पोहचवले जाते.
प्रत्येक कला ही नवरसांनी पूर्ण असते व आपले मन याच नवरसांवर आधारित असते. त्यामुळे जणू मनातील भावना जीवनात सादर करण्याचे काम जी कला करते, तिला जगण्याची कला म्हटले जाते आणि मग पुढे ती आपल्या आनंदाचे साधन होता होता उदरनिर्वाहाचे ही साधन बनत जाते.
उदाहरण, संगीतकला ही शब्द,ताल, लय, सूर यांचा मेळ; जे निसर्गातही आपणास सहज ऐकण्यास मिळते. एखाद्याच्या मनातील आनंद वा दुःखाचा उद्वेग हा तो गाणे गाऊन दुसऱ्यांना सांगण्याच्या नादात ते सकारात्मक व नकारात्मक भाव बाहेर टाकत असतो. त्यामुळे जर ती आनंद वा सकारात्मकता असेल तर ती ‘आनंद जसा दिल्याने वाढतो’, याप्रमाणे त्यास द्विगुणितता येते व दुःख किंवा नकारात्मकता असेल तर ‘दुःख दुसऱ्याला सांगितल्याने हलके होते’ अगदी तसेच आपणांस जाणवते. चित्रकलेतही चित्र काढताना आपण आपल्या भावना ओतून चित्र काढून त्या चित्राद्वारे दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तर कधी कधी बोलके चित्र असा दुस-यांकडून आपल्याला अभिप्रायही मिळतो.
थोडक्यात कोणतीही कला मनापासून सादर केल्याने मनाचे आरोग्य चांगले राहण्यास मदतच होते.
तेव्हा,
कला व मन यांचे नाते हे सख्यत्वाचे अन् आपुलकीचे;
जोपासुनी छंद कलेचा टिकवावे आरोग्य मनाचे…

✍️ श्वेता जोशी, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.